आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच फिक्सिंग : गुलाम बाेदीवर २० वर्षांची बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंच्युरियन- दक्षिण अाफ्रिकेचा माजी फलंदाज गुलाम बाेदीवर तब्बल २० वर्षांची बंदी घालण्यात अाली अाहे. मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभागी असल्यामुळे क्रिकेट मंडळाने ही कारवाई केली, अशी माहिती अध्यक्ष हारुन लाेगार्ट यांनी दिली. ‘गतवर्षी देशातर्गत क्रिकेट स्पर्धेदरम्यान बाेदीने मॅच फिक्सिंगसाठी प्रयत्न केला हाेता.
या प्रकरणाच्या सखाेल चाैकशीत हे समाेर अाले अाहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात अाली,’ असेही लाेगार्ट म्हणाले. त्याने २००७ मध्ये अाफ्रिकेकडून एक टी-२० सामना खेळला अाहे. या कारवाईमुळे अाता एकच खळबळ उडाली अाहे.