आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियासाठी 2007 ठरले खडतर : सचिन; आता सकारात्मक दिशेने भारतीय संघाची अागेकूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय संघासाठी २००७ हेे वर्ष अधिकच खडतर ठरले. मात्र, यातील अपयशातून सावरलेल्या टीम इंडियाने सकारात्मक निर्णयाच्या बळावर प्रगतीच्या दिशेने अागेकूच केली अाणि अल्पावधीमध्ये यशाचे शिखर गाठले, अशी प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली. मुंबई येथे अायाेजित एका कार्यक्रमात त्याने भारतीय संघाच्या अातापर्यंतच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला. २००७ च्या वर्ल्डकपमधील सुपर-८ साठीही भारताचा संघ पात्र ठरला नव्हता. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली संघाला समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे टीम इंडियाला बांगला देश अाणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला हाेता.  
 
या नामुष्कीमुळे या वर्षात भारतीय संघ प्रचंड दबावात हाेता. मात्र, त्यानंतर संघाने याेग्य दिशेने वाटचाल सुरू केली. अाताची भारतीय संघाची प्रगती ही काैतुकास्पद असल्याचेही ताे म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...