आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२२ वर्षांपासून मोहालीत टीम इंडिया आहे अजेय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - जागतिक क्रमवारीतील नंबर वन टीम इंडियासाठी मोहालीचे मैदान खास राहिले आहे. येथे भारत मागच्या २२ वर्षांपासून अजेय आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या २६ नोव्हेंबर, शनिवारपासून येथेच मालिकेतील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे.
विशाखापट्टनम येथे झालेली मालिकेतील दुसरी कसोटी भारताने २४६ धावांनी जिंकली होती. या विजयासह टीम इंडिया मालिकेत १-० ने पुढे आहे. आता मोहालीत ही आघाडी वाढवण्याच्या इराद्याने टीम इंडिया खेळेल.
मोहाली भारतासाठी भाग्यशाली
भारताने या मैदानावर मागच्या ३ कसोटींत ऑस्ट्रेलियाला दोनदा, तर द. आफ्रिकेला एकदा हरवले. आता भारताच्या रडारवर इंग्लिश टीम आहे. मोहालीत कसोटी क्रिकेटला १९९४ मध्ये सुरुवात झाली. तेव्हा वेस्ट इंडीजने भारताला २४३ धावांनी हरवले होते. त्यानंतर या मैदानावर झालेल्या ११ कसोटी सामन्यांत भारताने एकही पराभव स्वीकारला नाही. या ११ पैकी भारताने ६ कसोटी जिंकल्या, तर ५ सामने ड्रॉ झाले.
३ पैकी २ सामने भारताने जिंकले
भारत आणि इंग्लंड यांच्यात मोहली येथे ३ सामने झाले आहेत. यात भारताने २ मध्ये विजय मिळवला, तर एक सामना ड्रॉ झाला. भारताने डिसेंबर २००१ मध्ये इंग्लंडला १० विकेटने हरवले होते. यानंतर भारताने पुन्हा मार्च २००६ मध्ये इंग्लंडला ९ विकेटनी मात दिली. डिसेंबर २००८ मध्ये दोन्ही संघांत येथे सामना ड्रॉ झाला. दरम्यान, मला संघात निवडीची आशा होती, असे मत पार्थिव पटेलने व्यक्त केले. मी चांगली कामगिरी करत होतो,असेही तो म्हणाला.
कोहलीची विश्रांती
भारतीय संघ २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी आज स्टेडियमवर पोहोचला. आजचे सराव शिबिर खेळाडूंसाठी पर्यायी होते. भारताची रनमशीन विराट कोहलीने गुरुवारी सराव न करता विश्रांतीला प्राधान्य दिले. कोच अनिल कुंबळेने संघाच्या युवा खेळाडूंकडून कसून सराव करवून घेतला. अश्विननेसुद्धा विश्रांती घेतली.
गोलंदाज जबाबदारी पार पाडत आहेत : कुंबळे
सामन्याआधी कुंबळेने म्हटले की, ‘फलंदाज आपले काम करत आहेत. मात्र, गोलंदाज दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. ते सलग विकेट घेत असून गरजेप्रसंगी धावासुद्धा काढत आहेत. गोलंदाजांनी राजकोटला २४० षटके टाकली, तर विझागला २०० षटके गोलंदाजी केली. '
बातम्या आणखी आहेत...