आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Record: 23 year old Tobago Batsman Iraq Thomas Slams T20 Century Off 21 Balls

इराक थॉमसने मोडला ख्रिस गेलचा विक्रम; 21 चेंडूंमध्ये झळकावले शतक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट ऑफ स्पेन- वेस्ट इंडीजचा २३ वर्षीय युवा क्रिकेटपटू इराक थाॅमसने टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) रचला आहे. थॉमसने प्रथम श्रेणीच्या एका सामन्यात त्रिनिदा अँड टोबॅगोचे प्रतिनिधित्व करताना २१ चेंडूंत शतक ठोकले. त्याने वेस्ट इंडीजच्याच क्रिस गेलचा ३० चेंडूंत शतक ठोकण्याचा विक्रम मोडला. गेलने आयपीएल-६ मध्ये हा विक्रम केला होता.

इराक थॉमसने हा विक्रम टोबॅगो क्रिकेट संघटनेकडून आयोजित स्पर्धेत केला. ही लढत स्क्रेबारह आणि स्पेसाइड्स यांच्यात खेळला गेला. स्पेसाइड्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १५२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात स्क्रेबारहकडून इराक थॉमसने ३१ चेंडूंत १३१ धावा ठोकून आपल्या टीमचा विजय निश्चित केला.

१३१ धावांच्या खेळीत इराकने १५ गगनभेदी षटकार मारले. यासह त्याने पाच चौकारही ठोकले. गेलने १७५ धावांची विक्रमी खेळी केली होती तेव्हा त्याने १७ षटकार, १३ चौकार मारले होते. इराकने १३ षटकार, चौकारांच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. त्याने ९० धावा चौकार, षटकारानेच पूर्ण केल्या. १० धावा धावून काढल्या.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रिचर्ड लेवी नंबर वन
टी-२०च्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात वेगवान शतक ठोकण्यात द. अाफ्रिकेचा रिचर्ड लेवी (४५ चेंडू) अव्वल आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकले होते. डुप्लेसिस (४६ चेंडूंत शतक) दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या गेलने ४७ चेंडूंत शतक ठोकले. त्याने याच वर्षी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली.

असे होते गेले रेकॉर्ड
> यापूर्वी टी 20 क्रिकेटमध्‍ये वेस्ट इंडीजचाच फलंदाज क्रिस गेल याने सर्वात वेगवान शतक झळकावले होते.
> त्‍याने आयपीएलमध्‍ये पुणे वॉरियर्सच्‍या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून खेळताना 30 चेंडूत शतक केले होते.
> वन डेमध्‍ये सर्वात वेगवान शतक झळकवण्‍याचा विक्रम एबी डिविलियर्सच्‍या नावावर आहे. त्‍याने 31 चेंडूत शतक केले.

पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, टी-20 मधील सर्वात 5 फास्टेस्ट सेन्चुरीबाबत...