आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ZIM vs IND - भारताकडून झिम्‍बाब्‍वेचा पराभव, भुवनेश्वरने केले चौघांना बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्धशतकाच्‍या भागिदारीनंतर राहणे आणि  मुरली विजय. - Divya Marathi
अर्धशतकाच्‍या भागिदारीनंतर राहणे आणि मुरली विजय.
झिम्‍बाब्‍वेविरूद्ध एकदिवसीय सिरीजचा दुसरा वनडेही भारताने 62 धावांनी जिंकला. खराब सुरूवात व एकापाठोपाठ जाणा-या विकेटमुळे 272 धावांचे आव्‍हान गाठणे झिम्‍बाब्‍वेच्‍या अवाक्‍याबाहेर गेले. 49 ओव्‍हरमध्‍ये 10 गडी गमावून झिम्‍बाब्‍वेने 209 धावा केल्‍या त्‍यामुळे ही वनडे सिरीज टीम इंडियाच्‍या नावावर झाली.
झिम्‍बाब्‍वेच्‍या पहिल्‍या फळीतील 4 गडी एकट्या भुवनेश्वर कुमारने बाद केले. धवल कुलकर्णी, हरभजन सिंह, स्टुअर्ट बिन्नी व अक्षर पटेल या गोलंदाजांनी प्रत्‍येकी एक एक गडी बाद केला. झिम्‍बाब्‍वेचे 6 गडी हे 33 ओव्‍हरमध्‍येच बाद झाले. पहिल्‍या फळीतील भरवशाचे फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परतल्‍याने शेवटपर्यंत दबाव टिकून होता. एकदिवसीय सिरीजच्‍या दुस-या सामन्‍यात भारतीय संघाने 272 धावांचे आव्‍हान झिम्‍बाब्‍वेसमोर ठेवले आहे. त्‍याआधी टीम इंडियाचे आठ गडी बाद झाले. शेवटी हरभजन सिंह 5 धावांवर नॉट आऊट राहिला. राहणेने 63 त्‍यापाठोपाठ मुरली विजयने 72 धावा केल्‍या. रायडू 41 धावा काढून तंबूत परतला. तिवारी, उथप्‍पा, बिन्‍नी, केदार जाधव यांना वैयक्‍तिक तीस धावांपुढे मजल मारता आली नाही. पटेल 1 धाव काढून बाद झाला. झिम्‍बाब्‍वेच्‍या मॅट्जिवाने भारताचे चार गडी बाद केले.
झिम्बाब्वे दौर्‍यादरम्‍यान हरारे येथे एकदिवसीय सिरीजच्या दुस-या सामन्‍याच्‍या सुरूवातीला झिम्‍बाब्‍वेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा मुरली विजय आणि अजिंक्‍य राहणे यांची शतकाची भागीदारी राहिली. गोलंदाजांनीही धावांवर नियंत्रण ठेऊन प्रतिस्‍पर्धी संघाचा एक एक गडी बाद केला.
झिम्‍बाब्‍वे - कोणाच्‍या किती धावा
सुरूवातीलाच झिम्‍बाब्‍वेला तीन मोठे झटके बसले. त्‍यानंतर सिभाभा 72 धावा काढून बाद झाला. इतरांचा मात्र भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. त्‍यांना वैयक्‍तिक 20 रनांपेक्षा एकही रन आपल्‍या पदरी पाडून घेता आला नाही. सिभाभा, सिकंदर रजा (18), सिबांदा ( 2 ), मस्‍कदझा (5), चिगुंबरा ( 9 ), विल्‍यम्‍स ( 20 ) असे गडी झिम्‍बाब्‍वे संघाने गमावले आहेत.
हे आहेत खेळाडू
भारत - अजिंक्य राहणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), मुरली विजय, मनोज तिवारी, अंबाती रायडू, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, हरभजन सिंह, भुवनेश्वर कुमार, धवल कुलकर्णी.
झिम्बाब्वे - एल्टन चिगुंबरा (कर्णधार), सिकंदर रजा बट्ट, चामुनोर्वा चिभाभा, ग्रीम क्रेमर, हॅमिल्टन मास्‍कदझा, रिचमंड मुतुंबनी, वुसिमुजी सिबांदा, डोनाल्ड त्रिपानो, ब्रायन विटोरी, मॅट्जिवा आणि सीन विलियम्स.