आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुवनेश्वरच्या ५ विकेट; भारताला आघाडीची संधी; किवीज फलंदाजांची निराशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर कुमारने 33 धावांत 5 गडी बाद केले. - Divya Marathi
भुवनेश्वर कुमारने 33 धावांत 5 गडी बाद केले.
कोलकाता - उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने प्रदीर्घ कालावधीनंतर घातक गोलंदाजी करताना पाहुण्या न्यूझीलंड संघाला बॅकफूटवर ढकलले. त्याने ३३ धावांत ५ गडी बाद केले. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघ अद्याप १८८ धावांनी मागे आहे.
पावसाचा व्यत्यय असलेल्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने ७ विकेट अवघ्या १२८ धावांत गमावल्या. भारताच्या ३१६ धावांच्या तुलनेत किवीज टीम १८८ धावांनी मागे असून, भारताला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या केवळ ३ विकेट शिल्लक आहेत. या सामन्यात उमेश यादवच्या जागी भुवनेश्वरचा संघात समावेश करण्यात आला.
वृद्धिमान साहाचे अर्धशतक
भारताने ७ बाद २३९ धावांवर पुढे खेळण्यास सुरुवात केली. विकेटकिपर फलंदाज वृद्धिमान साहाने नाबाद ५४ धावांची खेळी केली. या अर्धशतकामुळे भारताने ३१६ धावांचा टप्पा गाठला. साहाने ८५ चेंडूंत ७ चौकार मारले आणि २ षटकार ठोकले.
भुवनेश्वरच्या चौथ्यांदा ५ विकेट
भुवनेश्वरने कारकीर्दीत चौथ्यांदा एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याने भुवनेश्वरने सलामीवीर गुप्तिल (१३), हेनरी (१), कर्णधार टेलर (३६),सँटनर (११) व मॅट हेनरी (०) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रॉस टेलरने ८० चेंडूंत ५ चौकार मारताना ३६ धावा काढल्या. रोंचीने ५२ चेंडूंत ३५ धावा काढल्या. त्याला रवींद्र जडेजाने टिपले.
धावफलक
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
(कालच्या ७ बाद २३९ धावांवरुन पुढे)
साहा नाबाद ५४ ८५ ०७ २
जडेजा झे. हेनरी गो. वॅग्नर १४ ३१ ०० १
भुवनेश्वर पायचीत गो. सँटनर ०५ ११ ०१ ०
मो. शमी झे. हेनरी गो. बोल्ट १४ १४ ०३ ०
अवांतर : १८. एकूण : १०४.५ षटकांत सर्वबाद ३१६ धावा. गडी बाद क्रम : १-१, २-२८, ३-४६, ४-१८७, ५-१९३, ६-२००, ७-२३१, ८-२७२, ९-२८१, १०-३१६. गोलंदाजी : बोल्ट २०.५-९-४६-२, हेनरी २०-५-४६-३, नील वॅग्नर २०-५-५७-२, सँटनर २३-५-८३-१, जितेन पटेल २१-३-६६-२.
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
गुप्तिल त्रि. गो. भुवनेश्वर १३ १३ ०३ ०
लँथम पायचीत गो. मो. शमी ०१ ०२ ०० ०
निकोल्स त्रि.गो. भुवनेश्वर ०१ ११ ०० ०
टेलर झे. विजय गो. भुवनेश्वर ३६ ८० ०५ ०
रोंची पायचीत गो. जडेजा ३५ ५२ ०५ १
सँटनर पायचीत गो. भुवनेश्वर ११ २० ०२ ०
बी.जे.वॉटलिंग नाबाद १२ १७ ०२ ०
हेनरी त्रि. गो. भुवनेश्वर ०० ०१ ०० ०
जितेन पटेल नाबाद ०५ ०८ ०१ ०
अवांतर : १४. एकूण : ३४ षटकांत ७ बाद १२८ धावा. गडी बाद क्रम : १-१०, २-१८, ३-२३, ४-८५, ५-१०४, ६-१२२, ७-१२२. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-०-३३-५, शमी ११-०-४६-१, जडेजा ८-३-१७-१, आर. अश्विन ५-२-२३-०.
बातम्या आणखी आहेत...