आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला हरवले, कसोटीत नंबर 1

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता कसोटी 178 धावांनी जिंकल्यानंतर विराट कोहलीने असा आनंद व्यक्त केला. - Divya Marathi
कोलकाता कसोटी 178 धावांनी जिंकल्यानंतर विराट कोहलीने असा आनंद व्यक्त केला.
कोलकाता - ऑफस्पिनर आर. अश्विन (८२ धावांत ३ बळी), लेगस्पिनर रवींद्र जडेजा (४१ धावांत ३ बळी) आणि वेगवान गोलंदाज मोहंमद शमीच्या (४६ धावांत ३ बळी) जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत १७८ धावांनी मोठा विजय मिळवला. याबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. यष्टिरक्षक वृद्धिमान साहा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. त्याने या सामन्यात दोन नाबाद अर्धशतके (ना. ५४ व ५८) झळकावली. भारताने किवींसमोर ३७६ धावांचे खडतर आव्हान ठेवले होते. ईडन गार्डनवर सोमवारी चौथ्या दिवशी पाहुण्यांना १९७ धावांवर चीत केले. भारताने कानपूर कसोटी १९७, तर कोलकाता कसोटी १७८ धावांनी जिंकली.

ईडन गार्डनवर २५० वा विजय : भारताने कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर कसोटी इतिहासातील ५०० वी कसोटी जिंंकली होती. शमीने ट्रेंट बोल्डच्या यष्ट्या उडवून चौथ्या दिवशी १.५ षटके शिल्लक असताना विजय भारताच्या पारड्यात टाकला होता.

कुंबळे प्रशिक्षक बनल्यानंतर विजयाचा चौकार : कुंबळे प्रशिक्षक बनल्यानंतर भारताने ६ पैकी ४ कसोटी सामने जिंकले. टीम इंडियाने प्रत्येक आघाडीवर छान कामगिरी केली. किवींना एकदाही पुनरागमनाची संधी दिली नाही. भारताने आपला डाव सोमवारी सकाळी ८ बाद २२७ धावांवर पुढे सुरू केला. तो २६३ धावांवर संपला. साहाने नाबाद ५८ धावा केल्या.

लॅथमच्या सर्वाधिक ७४ धावा : किवींची सुरुवात चांगली झाली. एक वेळ त्यांच्या १ बाद १०४ धावा होत्या. सलामीवीर टॉम लॅथमने १४८ चेंडूंत ८ चौकारांसह सर्वाधिक ७४ धावा काढल्या. ल्यूक रोंची ३२, मार्टिन गुप्तिल २४ आणि हेन्री निकोल्सने २४ धावांचे योगदान दिले. लॅथमने निकोल्ससह दुसऱ्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली.

शेवटच्या सत्रात ७ बळी
न्यूझीलंडने लंचपर्यंत बिनबाद ५५ धावा केल्या होत्या. मात्र, चहापानावेळी त्यांची अवस्था ३ बाद १३५ झाली. शेवटच्या सत्रात त्यांनी ७ गडी गमावले. शमीने सलग दोन षटकांत सेंटनर आणि वॉटलिंगला बाद केले. जडेजाने रोंचीला क्लीन बोल्ड करून न्यूझीलंडचे शेपूट वळवळू दिले नाही.
कोहलीने टाकले द्रविडला मागे
कोहलीच्या नेतृत्वात भारताचा हा १६ कसोटीत नववा विजय ठरला आहे. सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधाराच्या शर्यतीत आता कोहली राहुल द्रविडच्या (०८ विजय) पुढे आहे. कोहली सध्या गावसकर आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्या बरोबरीला आहे. कोहलीच्या पुढे धोनी (२७ विजय) आहे.
देशात २५० वी कसोटी जिंकणारा एकमेव संघ
टीम इंडिया एकूण कामगिरीत व घरच्या मैदानावर २५० वी कसोटी जिंकणारा एकमेव संघ बनला आहे.
तरीही पाक नंबर १ हाेणार नाही
पाक-वेस्ट इंडीजमध्ये ३ सामने आहेत. भारताने न्यूझीलंडसोबत तिसरा सामना ड्रॉ केला व पाकने विंडीजला क्लीन स्वीप दिले तरी पाक नंबर १ होणार नाही.

८३ वर्षांत प्रथमच घरच्या मैदानावर न हरता जिंकले १२ पैकी ११ कसोटी सामने
टीम इंडियाने मागील १२ पैेकी ११ कसोटी जिंकल्या. एक ड्रॉ झाली. ही देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी नोव्हेंबर १९८८ ते नोव्हेंबर १९९४ दरम्यान १२ पैकी ११ कसोटी जिंकल्या होत्या. पण एका कसोटीत पराभव झाला होता.

भारतात एलबीडब्ल्यूचा २० वर्षांचा विक्रम मोडला
१५ फलंदाज एलबीडब्ल्यू झाले. भारतात सर्वाधिक. मागचा विक्रम १३ एलबीडब्ल्यूचा (विरुद्ध दक्षिण अाफ्रिका, अहमदाबाद, १९९६) होता.

पाचव्यांदा क्षेत्ररक्षकाला मिळाला मॅन ऑफ द मॅच
५०१ कसोटीत क्षेत्ररक्षक मॅन ऑफ द मॅच बनण्याची पाचवी वेळ. साहापूर्वी मोंगिया(१), अजय रात्रा (१) व धोनीला दोन वेळा सन्मान.

९ व्यांदा वेगवान गोलंदाजांच्या २६ हून
जास्त विकेट : २६ विकेट घेतल्या वेगवान गोलंदाजांनी या सामन्यात. वेगवान गोलंदाजांनी यापेक्षा जास्त विकेट घेतल्या अशा ८ कसोटीच भारतात.

हेही आहे महत्त्वाचे
- ११ कसोटी सामने टीम इंडियाने मागच्या १२ सामन्यांपैकी घरच्या मैदानावर जिंकले आहेत. मागच्या १२ कसोटीत भारताची कामगिरी दमदार राहिली आहे. १९८८ नोव्हेंबर ते १९९४ दरम्यान सुद्धा भारताने १२ कसोटी पैकी ११ मध्ये विजय मिळवला होता. मात्र, एका कसोटीत पराभव झाला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारताने चांगला खेळ केला.
- ०५ व्यांदा कसोटीत भारताच्या विकेटकिपरला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. याआधी नयन मोंगिया, अजय रात्रा प्रत्येकी एक वेळा तर धोनी दोन वेळा सामनावीर ठरला.
- १२ कसोटी सामने कोहलीच्या नेतृत्वात एकही पराभव न स्वीकारता खेळले आहेत. कोहली धोनीच्या (११ कसोटी) पुढे निघाला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोलकाता कसोटीतील क्षणचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...