आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयला ३० डिसेंबरची डेडलाइन, लोढा समितीचे आदेश; बदलाचे वारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. लोढा समितीने गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपल्यातील बदलासाठी ३० डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. तसेच लोढा समिती अवैध असल्याचा माजी न्यायाधीश काटजू यांचा मंडळाचे सचिव अजय शिर्के यांनी सादर केलेला अहवालही समितीने फेटाळला. तसेच बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीसाठी १५ डिसेंबरची वेळ निश्चित करण्यात आली. तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या संचालक मंडळाच्या स्थापनेसाठी ३० डिसेंबरपर्यतची वेळ देण्यात आली. त्यामुळे आता बीसीसीआयला जलद गतीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या नव्या सर्वोच्च परिषदेच्या स्थापनेसाठीची वेळही बीसीसीआयला पाळावी लागेल. बीसीसीआयमधील बदलाच्या शिफारसी देणाऱ्या लोढा समितीने रविवारी दिल्लीतील बैठकीत ही मुदत निश्चित केली. दिलेल्या मुदतीपर्यंत बीसीसीआयला आपल्या समितीची स्थापना करणे आणि नव्याने व्यवस्थापनाची निवड करण्याची सक्ती आहे. ज्याचा शिफारशीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे.

२१सप्टेंबरला सर्वसाधारण सभा : समितीच्याआदेशापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या सर्वसाधारण समितीची तारीख निश्चित केली होती. त्यामुळे निश्चित वेळेनुसार २१ सप्टेंबर रोजी वार्षिक सभा होईल.

सभेसाठीनवे नियम : लोढासमितीने आपल्या बैठकीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी सर्वसाधारण सभेसाठी नवे नियम घालून दिले आहेत. यानुसार आता मंडळ हे एमजीएमला २०१५-१६ सत्रातील कामकाजापर्यंत कायम ठेवेल. तसेच २०१६-१७ च्या सर्व विषयाची चर्चा ही समितीचे नियम लागू झाल्यानंतरच करण्यात यावी. लोढा समितीने नुकत्याच अमेरिकेतील भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० सामन्यांच्या मालिकेवरही ताशेरे ओढले. बीसीसीआयने याबाबतची परवानगी घेताच ही मालिका खेळल्याबाबतची नाराजी समितीने व्यक्त केली.
समितीनेभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अजय शिर्के यांचा अहवाल फेटाळून लावला. यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी लोढा समितीच्या शिफारसी अवैध आणि असंवैधानिक असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हाच अहवाल लोढा समितीने फेटाळून लावला. हे केवळ काटजू यांचे विचार असल्याचेही समितीने स्पष्टोक्ती केली.

राज्य संघटनेच्या निवडणुकांसाठीही निश्चित कालावधी : राज्यसंघटनाच्या निवडणुकांसाठीही लोढा समितीने मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे आता १५ नोेव्हेंबरपर्यंत सर्व राज्यांना आपल्या निवडणुका घ्याव्या लागणार आहे, अन्यथा समितीच्या कारवाईला समोरे जावे लागेल.
सचिव शिर्केंना धक्का
बातम्या आणखी आहेत...