आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3rd Test: Australia Set To Unleash Twin Spin Attack Against West Indies

ऑस्ट्रेलिया-विंडीज कसोटी आजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - रविवारी सुरू होत असलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत वेस्ट इंडीजला पराभूत करून मालिका ३-० ने जिंकण्याच्या लक्ष्याने यजमान ऑस्ट्रेलिया मैदानावर उतरेल. ऑस्ट्रेलिया मालिकेत २-० ने पुढे असून, आता क्लीन स्वीपच्या इराद्याने कांगारू खेळणार आहेत.

सिडनी क्रिकेट मैदानाच्या (एसीसीजी) फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा विचार करताना ऑस्ट्रेलिया सिडलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये लेगस्पिनर किफेला संधी मिळू शकते. या मैदानावर मागच्या दहा वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलिया दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरेल. यापूर्वी २००६ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध शेन वॉर्न व स्टुअर्ट मॅकगिलसह ऑस्ट्रेलियन टीम मैदानावर उतरली होती.

दुसरीकडे मालिकेतील दोन कसोटींत सपाटून मार खाल्ल्यानंतर वेस्ट इंडीज टीम तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करेल. विडींजचा देवेंद्र बिशू दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलिया : स्टिवन स्मिथ (कर्णधार), जो. बर्न्स, ख्वाजा, अॅडम वोग्स, मिशेल मार्श, पीटर नेव्हिल, स्टिव ओ किफे, जेम्स पॅटिन्सन, जाेश हेझलवूड, नॅथन लाॅयन.

वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, राजेंद्र चंद्रिका, ब्राव्हो, सॅम्युअल्स, जर्मेन ब्लॅकवूड, रामदीन, कार्लोस ब्रेथवेट, टेलर, जोमेल वॉरिकन, मिगुएल कमिन्स.

पिंक कॅप घालून खेळणार
सामन्यात आॅस्ट्रेलियन खेळाडू पिंक कॅप घालून मैदानावर उतरतील. मॅकग्रा फाउंडेशनकडून ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी सुरू असलेल्या अभियानाला समर्थन देण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम पिंक कॅप घालून खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली. मॅकग्रा फाउंडेशनचा संस्थापक आणि माजी खेळाडू ग्लेन मॅकग्राने सर्व खेळाडूंना िपंक बॅकी प्रदान केली आहे, असे मंडळाने सांगितले.