आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND Vs NZ: अश्विनचा किवींना पुन्हा एकदा \'पंच\'; न्यूझीलंड सर्वबाद 299

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. अश्विनने किवी संघाला पुन्हा एकदा झटका देत 81 धावांत 6 गडी बाद केले. - Divya Marathi
आर. अश्विनने किवी संघाला पुन्हा एकदा झटका देत 81 धावांत 6 गडी बाद केले.
इंदूर- भारताने पहिल्या डावात 5 बाद 557 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर न्यूझीलंड संघानेही जोरदार सुरुवात केली खरी पण त्यानंतर भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने त्यांना पुन्हा एकदा 'पंच' मारून बॅटफूटवर ढकलले. अश्विनने 81 धावांत 6 तर जडेजाने 80 धावांत 2 गडी टिपल्याने न्यूझीलंड सर्वबाद 299 धावा करू शकला. भारताला पहिल्या डावात तब्बल 258 धावांची आघाडी मिळाली. तिस-या दिवसअखेर भारताने नाबाद 18 धावा केल्या होत्या. भारताकडे सध्या 275 धावांची आघाडी आहे.
चांगल्या सुरुवातीनंतर किवींना अश्विनचे धक्के-
- इंदूर कसोटीत तिस-या दिवशी न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सकाळी चांगली फलंदाजी सुरु ठेवली.
- सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि टॉम लँथम यांनी 118 धावांची सलामी दिली.
- त्यानंतर सलामीवीर टॉम लँथम (53) धावांवर बाद झाला. त्याने अश्विनने झेलबाद केले.
- त्यानंतर अश्विनने किवींना लागोपाठ दोन धक्के दित त्यांना बॅकफूटवर ढकलले.
- अश्विनने कर्णधार केन विल्यमसन (8) आणि त्यानंतर रॉस टेलरला (0) बाद केले.
- हे दोघे बाद होत नाहीत तोच आकर्षक खेळ करत असलेला मार्टिन गुप्टिल 72 धावांवर धावबाद झाला.
- त्यानंतर अश्विनने ल्यूक रांचीलाही टेलरप्रमाणेच शून्यावरच रहाणेकडे झेलबाद केले.
- त्यामुळे किवी संघ नाबाद 118 धावांवरून 5 बाद 148 असा अडचणीत आला.
- त्यानंतर बीजे वाटलिंग 23 धावा काढून जडेजाच्या गोलंदाजीवर रहाणेकडे झेलबाद झाला.
- मिशेल सँटनेरला 22 धावांवर रविंद्र जडेजाने टिपले.
- आर. अश्विनने निशमला 71 धावांवर पायचित केले. जतिन पटेल 18 धावांवर धावबाद झाला.
- अखेर अश्विनने बोल्टला पुजारा द्वारे झेलबाद करत किवींचा डाव संपवला.
- अश्विनने 81 धावांत 6 तर जडेजाने 80 धावांत 2 गडी बाद केले. दोन फलंदाज धावबाद झाले.
भारताचा 557 धावांचा डोंगर-
- कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक (२११) आणि अजिंक्य रहाणेच्या (१८८) दीड शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला.
- कोहली आणि रहाणे यांनी कसोटीत वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर उभा केला. या दोघांच्या खेळीच्या बळावर भारताने पहिल्या डावात ५ बाद ५६५ धावा काढल्या.
- भारताने घरच्या मैदानावर ४३ महिन्यांच्या अंतराने ५०० प्लसचा स्कोअर उभा केला. याआधी मार्च २०१३ मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबाद कसोटीत ५०३ धावा काढल्या होत्या.
- कोहली आणि रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी ३५६ धावांची भागीदारी केली. भारताकडून ही एकूण पाचवी सर्वात मोठी भागीदारी झाली, तर चौथ्या विकेटसाठी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी भागीदारी आहे.
- प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ९ षटकांत बिनबाद २८ धावा काढल्या होत्या. त्या वेळी मार्टिन गुप्तिल १७ आणि टॉम लँथम सहा धावांवर खेळत होते. न्यूझीलंड संघाला पेनॉल्टीच्या ५ धावा मिळाल्या. भारताच्या डावादरम्यान रवींद्र जडेजा खेळपट्टीवर धावल्यामुळे पंचांनी न्यूझीलंडला ५ धावा दिल्या.
रहाणेचे द्विशतक हुकले-
- भारताने सकाळी ३ बाद २६७ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. भारताने सकाळच्या दोन सत्रांत एकही विकेट गमावली नाही. - चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारताचा स्कोअर ४५६ धावा असा झाला होता. तिसऱ्या सत्रात कोहली जितेन पटेलचा बळी ठरला.
- कोहलीने ३६६ चेंडूंचा सामना करताना २० चौकार मारले. रहाणेचे द्विशतक अवघ्या १२ धावांनी हुकले. त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. - रहाणेने ३१८ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि ४ षटकार मारले. रहाणे १८८ धावा काढून बाद झाले.
- यानंतर रोहित शर्माने (नाबाद ५१) न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहितने ६३ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ३ चौकाराने ही खेळी केली.
कोहलीत लिडर म्हणून प्रगती : अजिंक्य रहाणे
- विराट कोहलीने फलंदाज आणि एक कर्णधार, नेता म्हणून खूप प्रगती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयी कामगिरी करण्यास सज्ज आहे, अशी स्तुती भारताचा मधल्या फळीचा फलंदाज अजिंक्य रहाणेने केली.
- कोहलीच्या द्विशतकी खेळीदरम्यान दुसऱ्या टोकाने त्याची फलंदाजी पाहण्याची मजा काही औरच आहे. तो नेत्रदीपक फलंदाजी करतो. डोळ्यांचे पारणे फेडतो.
- आम्ही खेळपट्टीवर टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रयत्न यशस्वी झाले, असे तो म्हणाला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, तिस-या दिवसाची क्षणचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...