आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत वि. विंडीज : आजपासून चौथी कसोटी रंगणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाेर्ट ऑफ स्पेन - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथ्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी लढतीला गुरुवारी सुरुवात होत आहे. भारत मालिकेमध्ये २-० ने पुढे असून या लढतीपूर्वीच कसोटी क्रमवारीतदेखील अव्वल स्थानावर विराजमान झाला. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि नवीन मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी चौथ्याच्या विजयासह मालिका संपवण्याचा निर्धार केला आहे.

लढतीपूर्वी फलंदाज अजिंक्य रहाणेने म्हटले की, खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि मालिका ३-० ने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

अाताच्या मालिकेत फलंदाज आणि गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. विराटने फलंदाजांच्या क्रमात अनेक फेरबदल केले याचा संघाला फायदा झाला. फलंदाजांत रहाणेसह आर. अश्विनच्या क्रमात बदल केला. अश्विनला सहाव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. रोहित शर्माला तिसऱ्या कसोटीत अंतिम अकरात स्थान देण्यात आले. गोलंदाजीत अश्विनने १६, मो. शमीने ११ विकेट घेतल्या, तर १९ महिन्यांनंतर संघात परतलेल्या भुवनेश्वरकुमारने चांगली कामगिरी केली.
बातम्या आणखी आहेत...