टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-10 च्या पहिल्या सामन्यात 47 धावांनी पराभूत करत किवींनी भारताला धक्का दिला. किवींसोबचा भारताचा टी ट्वेन्टीमधील हा सलग पाचवा पराभव आहे. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला अवघ्या 7 विकेटवर रोखले. पण फलंदाजांना मात्र त्यांची कामगिरी चोखपणे पार पाडता आली नाही. अवघ्या 79 धावांत 18.1 ओव्हरमध्ये भारतीय टीम ऑलआऊट झाली. स्पिनर्सने भारताच्या नऊ फलंदाजांचा बळी घेतला.
भारताच्या पराभवाची 5 कारणे
- ओव्हर कॉन्फिडन्स
- स्पिनर्सना गांभीर्याने घेतले नाही
- पिच समजण्यात गडबड
- नियोदनाचा अभाव
- मानसिक दबाव
सामन्यातील काही Facts
- 79 धावांवर ऑलआऊट झाली टीम इंडिया. भारतात टी ट्वेन्टीतील सर्वात कमी स्कोर.
- भारताचा टी 20 तील दुसरा नीचांकी स्कोर. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात 74 वर झाले होते ऑलआऊट.
- 47 धावांनी झाला पराभव. टी 20 मधील दुसरा मोठा पराभव.
- 15 ओव्हरमधील 61 धावा हा भारताचा सर्वात कमी स्कोअर.
- न्यूझीलंडच्या स्पिनर्सने 9 विकेट घेतल्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारताच्या पराभवाची इतर कारणे..