आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवा वनडे: कमाल करते हो पांडेजी, भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - प्लेअर ऑफ द मॅच मनीष पांडेची (नाबाद १०४) तुफानी शतकी खेळी, प्लेअर ऑफ द सिरीज रोहित शर्माच्या ९९ धावा अाणि सलामीवीर शिखर धवनच्या शानदार ७८ धावांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाला पाचव्या आणि अखेरच्या वनडेत ६ विकेटने हरवले. या विजयामुळे भारताने आयसीसी क्रमवारीतील आपले दुसरे स्थानही कायम राखले. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका ४-१ ने आपल्या नावे केली. मनिष पांडेच्या शानदार खेळीने भारताला विजय मिळाला. भारताच्या विजयानंतर "कमाल करते हो पांडेजी..' हे वाक्य चाहत्यांच्या तोंडी होते.

भारताने ४९.४ षटकांत ४ बाद ३३१ धावा काढून ऑस्ट्रेलियाच्या ७ बाद ३३० धावांचा विशाल स्कोअर गाठला. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा एखाद्या संघाने ३०० पेक्षा अधिक धावा काढून विजय मिळवला आहे.

धोनी-पांडेची भागीदारी : पांडेने ८१ चेंडूंत नाबाद १०८ धावा ठोकताना ८ चौकार, १ षटकार मारला. पांडेचे हे कारकीर्दीतील पहिले शतक ठरले. पांडेने कर्णधार धोनीसोबत १४.३ षटकांत ९४ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. धोनीने अखेर फिनिशरची भूमिका पार पाडून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. त्याने ४२ चेंडूंत ३४ धावा काढताना १ षटकार, १ चौकार मारला.

रोहित-शिखरची मजबूत सलामी
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी १८.१ षटकांत १२३ धावांची शानदार सलामी मिळवून दिली. शिखरने ५६ चेंडूंत ७८ धावा ठोकल्या. विराट कोहली केवळ ८ धावा काढू शकला. धवन आणि कोहलीला हेस्टिंगने बाद केले.
रोहित-पांडेची भागीदारी : रोहितने यानंतर मैदानावर आलेल्या मनीष पांडेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची शानदार भागीदारी केली. रोहित आपल्या शतकापासून एका धावेने दूर असताना हेस्टिंगने त्याला यष्टिरक्षक वेडकरवी झेलबाद केले. रोहितने १०८ चेंडूंचा सामना करताना ९९ धावा काढल्या. यात त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारला. नर्व्हस ९९ चा बळी ठरलेला रोहित सहावा भारतीय ठरला. रोहितची विकेट २३१ धावांवर पडली. यानंतर पांडे आणि धोनीने भारताचा स्कोअर ३२५ पर्यंत पोहोचवला. धोनी बाद झाल्यानंतर पांडेने विजयाची जबाबदारी पार पाडली. कांगांरुकडून हेस्टिंगने ३ विकेट घेतल्या.
रोहित शर्माचे यश
१. मालिकेत ४०० धावांचा टप्पा गाठला. द. आफ्रिकेच्या हाशिम आमलानंतर दोन वेळा अशी कामगिरी करणारा तो जगातला दुसरा फलंदाज ठरला. रोहितने पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४०० धावांचा टप्पाही गाठला.
२. मालिकावीरचा पुरस्कार.
३. वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा गाठला.
अखेरच्या षटकातील रोमांच असा
अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १३ धावांची गरज होती. त्या वेळी धोनी २८ आणि मनीष पांडे ९८ धावांवर खेळत होते. कर्णधार धोनी बाद झाला त्या वेळी त्याने इशारा करून पांडेला स्ट्राइक बदलण्यास सांगितले. ही सूचना निर्णायक ठरली.
गोलंदाज : मिशेल मार्श
४९.१ : वाइड, १ धाव.
४९.१ : धोनीचा षटकार.
४९.२ : धोनी बाद.
४९.३ : मनीष पांडेचा चौकार, शतक पूर्ण केले.
४९.४ : मनीष पांडेच्या २ धावा, भारत विजयी.
वॉर्नर-मार्शची शतके
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर (१२२) आणि मिशेल मार्श (नाबाद १०२) यांच्या शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३३० धावा ठोकल्या. भारताने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. वॉर्नरने वनडेतील पाचवे शतक ठोकले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या मिशेल मार्शने कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. बुमराहने २ विकेट घेतल्या.
शानदार खेळ
ही मालिका स्पर्धात्मक ठरली. आधीच्या चार सामन्यांत आम्ही बरोबरीचा संघर्ष केला. मात्र, लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मनीष पांडे, रोहित शर्माने खूपच शानदार प्रदर्शन केले.
- महेंद्रसिंग धोनी, कर्णधार भारत.