आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 79% Indians Dont Want To India Pakistan Cricket Series

पाक क्रिकेट बोर्डाच्या धमकीनंतर 79% लोकांचा भारत-पाक क्रिकेट मालिकेला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) दरवर्षी डिसेंबर महिन्‍यात भारत आणि पाकमध्‍ये क्रिकेट मालिकेचे आयोजन करते. मात्र यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ला पाकने धमकीच दिली आहे. PCB चे चीफ शहरयार खान यांनी म्‍हटले की, या मालिकेत भारत सहभागी झाला नाही, तर पाकिस्तान ICC, ACC (आशियाई क्रिकेट कौन्सिल) मध्‍ये सहभागी होणार नाही.
79 टक्‍के वाचकांचा भारत-पाकिस्‍तान मालिकेला विरोध
यासंदर्भात 'दैनिक भास्‍कर'ने वाचकांच्‍या प्रतिक्रीया जाणून घेतल्‍या. दोन्‍ही देशात क्रिकेट मालिका व्‍हावी की नाही? असा प्रश्‍न विचारला असता 79 टक्‍के वाचकांनी या मालिकेला विरोध केला आहे. केवळ 21 टक्‍के वाचकांनाच वाटते की, भारत पाकिस्‍तानमध्‍ये क्रिकेट मालिका व्‍हावी. या वादविवादात फेसबुकवरही वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

मियांदादला आठवला आत्‍मसन्‍मान
पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने PCB आत्‍मसन्‍मान जपण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍याने ही मालिका व्‍हावी असे म्‍हटले आहे. पण भारताला याबाबत जास्‍त जबरदस्‍ती करू नये आपला आत्‍मसन्‍मान जपावा असा सल्‍लाही त्‍याने दिला आहे.
आफरीदी म्‍हणतो
पाकिस्‍तानचा क्रिकेटर शाहिद आफरीदी म्‍हणतो, " मला हे समजत नाही की, आपण वारंवार भारताने मालिका खेळावी असे का सांगतो. ते खेळण्‍यास तयार नाहीत त्‍यामुळे, जास्‍त महत्‍व देणे व्‍यर्थ आहे."

मालिकेतून चांगला पैसा येईल : शोएब अख्तर
माजी पाकिस्‍तानी गोलंदाज शोएब अख्तरला वाटते की, दोन्‍ही देशांमध्‍ये मालिका झाली तर, दोन्‍ही बोर्डकडे या माध्‍यमातून चांगला पैसा येईल. त्‍यामुळे त्‍यानेही भारत पाकिस्‍तान मालिका व्‍हावी असे म्‍हटले आहे. पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिस्बाह उल हक म्‍हणतो, "क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे आणि दोन्‍ही देशांनी आपसात खेळले पाहिजे."
दहशतवादी कारवाया बंद करा, तेव्‍हा खेळू : अनुराग ठाकुर
BCCI सचिव अनुराग ठाकुर यांनी पाकिस्‍तानच्‍या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्‍यांचे म्‍हणने आहे, "पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवणार नाही तोपर्यंत आम्‍ही क्रिकेट खेळणार नाही. भारत सरकारही आम्‍हाला खेळण्‍यास परवानगी देणार नाही. पाकला वाटते की, भारतासोबत क्रिकेट खेळावे, तर त्‍यांनी दहशतवादी कारवाया बंद करायला हव्‍या."
वाचकांच्‍या प्रतिक्रीया
पाकिस्‍तान क्रिकेट खेळण्‍याच्‍या बहान्‍यावरून दहशतवादाला खतपाणी देत आहे, अशा प्रतिक्रीया वाचकांमधून मोठ्या प्रमाणात समोर आल्‍या आहेत. काही वाचकांनी म्‍हटले, पाककडे पैसा कमी आहे. म्‍हणून ते खेळण्‍यासाठी आवाहन करत आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्‍यांचे आकडे
- दोन्‍ही संघांमध्‍ये 132 सामने खेळल्‍या गेले. त्‍यापैकी 72 पाकने, 51 सामने भारताने जिंकले आहेत. 5 सामने रद्द झाले, 4 सामने अनिर्णीत.
- दोन्‍ही संघांमध्‍ये भारतात 32 सामने खेळल्‍या गेले. 11 सामने भारताने, 19 पाकिस्‍तानने जिंकले. 2 सामने अनिर्णित ठरले.
- पाकमध्‍ये दोन्‍ही देशात 27 सामने झाले. यामध्‍ये 11 भारत, तर 14 सामने पाकिस्‍तानने जिंकले. 2 सामने अनिर्णित ठरले.
- विश्वचषकमध्‍ये भारत-पाकिस्तान दरम्‍यान 6 सामने खेळल्‍या गेले. हे सर्व सामने भारताने जिंकून विक्रम नोंदवला.
विश्वचषकमध्‍ये भारताचा विक्रम
1992 - भारताचा 43 धावांनी विजय
1996- भारताचा 39 धावांनी विजय
1999- भारताचा 47 धावांनी विजय
2003- भारताचा 6 बळींनी विजय
2011- भारताचा 29 धावांनी विजय
2015- भारताचा 76 धावांनी विजय
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, कशा आहेत वाचकांच्या प्रतिक्रीया..