आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपासून दूर धोनी सध्या अशा एन्जॉय करतोय सुट्या, शेअर केला VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परतल्यानंतर धोनी सध्या विश्रांती घेत आहे. निदाहास ट्रॉफीमध्ये त्याला विश्रांती देण्यात आल्याने सध्या तो त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. त्याची लाडकी लेक जीवा आणि पत्नी साक्षी धोनी यांच्याबरोबर धोनी सध्या सुट्या एन्जॉय करत आहे.


धोनीने शेअर केला व्हिडिओ 
नुकताच विराट कोहलीने सुट्या एन्जॉय करत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यात आता धोनीनेनी सुट्या एन्जॉय करत असल्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा यांच्याबरोबर सुट्या एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. काही फोटोंमध्ये धोनी त्याच्या डॉगीबरोबर खेळत असल्याचेही पाहायला मिळत आहे. 


लवकरच सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी आपल्याला खेळताना दिसेल. विशेष म्हणजे आयपीएलचा पहिला सामनाच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुंबईत होणार आहे. धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याच्याबरोबर रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनाहे जुने टीममेटही असतील. तसेच फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्रावोही याच संघात असणार आहे. 

 

पुढे पाहा, संबंधित Photos आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा Video

बातम्या आणखी आहेत...