आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादचा अंकित कर्नाटकविरुद्ध खेळणार; 4 मार्चपासून देवधर ट्राॅफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अाैरंगाबादचा युवा फलंदाज अंकित बावणे अाता विजय हजारे ट्राॅफी विजेत्या कर्नाटकविरुद्ध सामन्यात खेळणार अाहे. येत्या ४ मार्चपासून देवधर ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने इंडिया अ  अाणि इंडिया ब संघांची घाेषणा केली. या वेळी प्रतिभावंत अंकितला इंडिया ब संघात स्थान देण्यात अाले अाहे.  अश्विनकडे इंडिया अ अाणि श्रेयसकडे ब संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी साेपवण्यात अाली. अाता  हे दाेन्ही संघ देवधर ट्राॅफीमध्ये कर्नाटकविरुद्ध खेळणार अाहेत. ही स्पर्धा ४ ते ८ मार्चदरम्यान धर्मशालाच्या मैदानावर रंगणार अाहे. कर्नाटकने मंगळवारी फिराेजशहा काेटला मैदानावरील फायनलमध्ये साैराष्ट्राचा पराभव केला.  


अश्विनकडे अ संघाचे नेतृत्व

टीम इंडियाच्या अव्वल फिरकीपटू अार.अश्विनकडे इंडिया अ संघाचे कर्णधारपद साेपवण्यात अाले. या वेळी संघात अश्विनच्या नेतृत्वात पृथ्वी शाॅसह उन्मुक्त चंद, अक्षयदीप नाथ, रिकी भुई, सूर्यकुमार यादव, इशान, कृणाल पंड्या, माे. शमी, नवदीप सैनी, बासील, कुलवंत, अमनदीप व राेहित रायडूचा सहभाग असेल. 

 

श्रेयसच्या नेतृत्वात अंकितला संधी
अाैरंगाबादच्या अंकितला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली देवधर ट्राॅफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली अाहे. यामध्ये श्रेयस हा ब संघाचे नेतृत्व करणार अाहे. संघामध्ये ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईश्वरन, अंकित बावणे, मनाेज तिवारी, सिद्धेश लाड, के. भारत, जयंत यादव, धर्मेंद्रसिंग जडेजा, हनुमा विहारी, सिद्धार्थ काैल, हर्षल पटेल, खलील अहमद, उमेश यादव व रजत पाटीदारचा समावेश अाहे. 

बातम्या आणखी आहेत...