Home | Sports | Expert Comment | andre russell humbled by year long doping ban create many records in ipl 2018

1 वर्षाच्या डोपिंग बॅननंतर मैदानात परतला हा क्रिकेटर, 11 षटकार ठोकून दाखवली चमक

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 11, 2018, 05:44 PM IST

आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेलने दमदार सुरूवात केली आहे.

 • andre russell humbled by year long doping ban create many records in ipl 2018
  आंद्रे रसेल आपली पत्नी जेसिम लॉरासमवेत मस्ती करताना...

  स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसेलने दमदार सुरूवात केली आहे. चेन्नईविरूद्धच्या सामन्यात आंद्रे रसेलने केवळ 36 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या ज्यात 11 षटकांराचा समावेश होता. आयपीएल टूर्नामेंटमध्ये तो कोलकाता नाईटरायडर्स टीमकडून खेळतो. मात्र, गेल्या वर्षी डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने रसेलवर एक वर्षाची बंदी घातली होती. 30 जानेवारी 2017 ते 30 जानेवारी 2018 या दरम्यान ही बंदी होती. ज्यामुळे हा कॅरेबियन क्रिकेटर 2017 साली आयपीएलसह इतर कोणत्याही टूर्नामेंटमध्ये खेळू शकला नव्हता. एक वर्षाच्या बंदीने झाला विन्रम....

  - बंदी घातल्यानंतर आंद्रे रसेल फॅमिली आणि फ्रेंड्ससमवेत वेळ घालवला. याच काळात त्याने आपला हॉटेलचा बिजनेस सुरु केला.
  - 'रसेल्स टी-20 रेस्त्रां & स्पोर्ट्स बार' नावाचे त्याचे हे हॉटेल ओल्ड हार्बरमध्ये सुरू करण्यात आले आहे.
  - आंद्रे रसेल खपूच रंगेल स्वभावाचा व्यक्ती आहे. तसेच कॅरेबियन क्रिकेटर्स प्रमाणेच मौज मस्तीचे जीवन जगणे पसंत करतो.
  - मात्र, कालच्या रात्रीच्या खेळीनंतर बोलताना तो म्हणाला की, डोपिंगच्या बंदीनंतर मला अधिक विन्रम बनविले.
  - अहंकार बड्या बड्या दिग्गजांना झोपवतो. मी गेल्या एका वर्षात खूप काही शिकलो आहे. या दरम्यान मी विन्रम होणे शिकलो. मला आता शिखरावर पोहचल्यानंतर विन्रम राहायला शिकायचे आहे. पुन्हा अशी चूक करणार नाही.
  - आता मात्र, माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. माझा आत्मविश्वास उंचावला आहे. ज्याची मला खूप गरज होती. मी आता हवी तशी गोलंदाजी करत आहे व फलंदाजीही चांगली करत आहे.
  - रसेल आपल्या खेळासोबतच आपली मॉडेल पत्नी जेसिम लॉरा मुळेही चर्चेत राहतो.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आंद्रे रसेल व त्याच्या फॅमिली लाईफचे फोटोज...

Trending