Home | Sports | From The Field | BSF Jawan Shot Himself Killing 3 Of His Collogues In Tripura

त्रिपुरामध्ये बॉर्डर चौकीवरील बीएसएफ जवानाची 3 सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून आत्महत्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 06, 2018, 04:47 PM IST

बीएसएफच्या 55व्या बटालियनमध्ये जवान शिशुपाल (28 वर्षे) त्रिपुराच्या मागुरुली बॉर्डर चौकीवर तैनात होता.

 • BSF Jawan Shot Himself Killing 3 Of His Collogues In Tripura

  आगरतळा - त्रिपुरा बॉर्डरवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने बाचाबाचीदरम्यान केलेल्या अंधाधुंद फायरिंगमध्ये तीन सहकाऱ्यांचा जीव घेतला. त्यानंतर आरोपी जवानाने स्वतःला गोळी घालून घेत आत्महत्यादेखिल केली. ही घटना शनिवारी रात्री त्रिपुरातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौकीवर घडली. डीआयडी मृत्युंजय कुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आणि सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.


  रात्री ड्युटीहून परतल्यानंतर झाला वाद
  न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार उनाकोटीते एसपी लखी चौहान यांनी सांगितले की, बीएसएफच्या 55व्या बटालियनमध्ये जवान असलेले शिशुपाल (28 वर्षे) त्रिपुराच्या मागुरुली बॉर्डर चौकीवर तैनात होते. रात्री 1 वाजता शिशुपाल ड्युटीहून कॅम्पवर परतल्यानंतर त्याचा सहकाऱ्यांबरोबर वाद झाला.


  गोळी मारून पळत होता
  - वादानंतर आरोपी शिशुपालने एका हेड कॉन्स्टेबलला सर्व्हीस रायफलने गोळी मारली आणि पळू लागला. काही सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याने अंधाधुंद फायरिंग केले. यादरम्यान दोन जवान गंभीर जखमी झाले. थोड्या वेळाने जवानाने स्वतःला गोळी मारून घेतली.
  - कॅम्पमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या संतरीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोळीबाराबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला.

 • BSF Jawan Shot Himself Killing 3 Of His Collogues In Tripura

Trending