Home | Sports | From The Field | Chennai will play in IPL final against Hyderabad

प्लेऑफमध्ये टॉप स्कोरर आहे रैना, ठरू शकतो 5 हजार IPL धावा करणारा पहिला फलंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 26, 2018, 03:55 PM IST

रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.

 • Chennai will play in IPL final against Hyderabad
  - सुरेश रैनाने आतापर्यंत प्लेऑफमध्ये 18 मॅच खेळत 658 धावा केल्या आहेत.
  - रैनाशिवाय महेंद्र सिंह धोनीलाच सर्वाधिक 400 धावा करता आल्या आहेत.
  क्रीडा डेस्क - सुरेश रैनाच्या चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल-11 च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. रैना सातव्या वेळी फायनल खेळणारा दुसरा क्रिकेटपटू असेल. रैनापेक्षा अधिकवेळा संधी मिळणारा धोनी हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याला आठ वेळा ही संधी मिळाली आहे. रैनासाठी आयपीएलचे हे पर्व वैयक्तिक कामगिरीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4,953 धावा केल्या आहेत. म्हणजे, या स्पर्धेत पाच हजार धावा करणारा पहिला फलंहाज बनण्यापासून तो फक्त 47 धावा दूर आहे. त्याला फायनलमध्ये ही संधी आहे. त्यामुळे या पर्वात तो आयपीएलमध्ये 5,000 धावा करणारा पहिला फलंदाज बनू शकतो.
  प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा, दुसरा क्रमांक धोनीचा
  - सुरेश रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहेच. शिवाय प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
  - रैनाने आतापर्यंत प्लेऑफचे 18 सामने खेळले आहे. त्यात त्याने 50.46 च्या सरासरीने 169.07 च्या स्ट्राइक रेटने 658 धावा केल्या आहेत.
  - आगामी एक दोन वर्षांत त्याचा हा विक्रम मोडेल असा अंदाज आहे. महेंद्र सिंह धोनीशिवाय इतर कोणालाही प्लेऑफमध्ये 400 हून अधिक धावा करता आलेल्या नाहीत.
  - महेंद्र सिंह धोनीने 18 प्लेऑफ सामन्यांत 44.11 च्या सरासरीने आणि 139.79 च्या स्ट्राइक रेटने 406 धावा केल्या आहेत.
  - 5 वेळा टॉप-5 मध्ये होता रैना, फक्त 3 वेळा टॉप-10 बाहेर
  - सुरेश रैनाअजून फायनलमध्ये खेळणार आहे.
  - प्लेऑफमध्ये 7 वेळा 50 हून अधिक स्कोअर

 • Chennai will play in IPL final against Hyderabad

Trending