आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅच जिंकल्यानंतर प्रिती झिंटाने ख्रिस गेलला असे हग केले, पाहा त्यांची डान्स आणि मस्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅच संपल्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवड झालेल्या ख्रिस गेलने प्रिती झिंटाबरोबर अशाप्रकारे डान्स केला. - Divya Marathi
मॅच संपल्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवड झालेल्या ख्रिस गेलने प्रिती झिंटाबरोबर अशाप्रकारे डान्स केला.

स्पोर्ट्स डेस्क - PL 2018 च्या 16व्या मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादच्या टीमला 15 धावांनी पराभूत केले. मॅचमध्ये हैदराबातच्या संघासमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण त्यांना केवळ 178 धावाच करता आल्या. हा स्पर्धेतील हैदराबादचा पहिला पराभव आहे. या मॅचमध्ये पंजाबच्या विजयाचा हिरो ख्रिस गेल बनला. त्याने मॅचमध्ये पहिले शतक ठोकले. मॅच संपल्यानंतर गेलने टीमची को ओनर प्रिती झिंटाबरोबर चांगलीच मस्ती केली. 


हग, सेल्फी आणि डान्स..  
- गेलने या मॅचमध्ये नाबाद 104 धावा केल्या. 63 चेंडूंच्या या इनिंगमध्ये त्याने फक्त 1 चौकार आणि 11 षटकार खेचले. 
- गेल IPL 2018 मध्ये शतक ठोकणार पहिला फलंदाज बनला. तसेच हे त्याच्या IPL करिअरचे सहावे शतक ठरले. त्याच्या तडाखेबाज इनिंगमुळे त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच'ही बनवण्यात आले. 
- मॅच संपल्यानंतर या स्फोटक फलंदाजाने टीमची कोओनर प्रिटी झिंटाबरोबर चांगलीच मस्ती केली. प्रितीबरोबर त्याने सेल्फी घेतली आणि काही डान्स स्टेप्सही केल्या. 
- यावेळी गेलबरोबरच प्रितीही चांगलीच आनंदात होती. 


गेल आणि प्रिती यांनी केलेली मस्ती पाहा पुढील स्लाइड्सवरील फोटोवरून...

बातम्या आणखी आहेत...