Home | Sports | From The Field | Commonwealth Games Day 10 Shooting, Squash, TT, Hockey And News And Updates

कॉमनवेल्थ गेम्स: शूटर संजीव राजपूतने जिंकले सोने, अॅथलेटिक्समध्ये नीरज चोप्राचे भारतासाठी पहिले गोल्ड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2018, 12:07 PM IST

कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी शूटर संजीव राजपूतने 50 मीटर रायफल 3 पोझिशन्समध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले.

 • Commonwealth Games Day 10 Shooting, Squash, TT, Hockey And News And Updates

  गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी शूटर संजीव राजपूतने 50 मीटर रायफल 3 पोझिशन्समध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. या कॅटेगरीतील सिल्व्हर कॅनडाच्या जॉर्ज सेश आणि ब्राँझ इंग्लंडच्या डीन बेलेने जिंकवून दिले. दुसरीकडे, ब्राँझ मेडलसाठी झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी टीमचा इंग्लंडकडून 6-0 ने पराभव झाला. या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे आतापर्यंत 47 मेडल झाले आहेत. यात 20 गोल्ड आहेत. भारताने सर्वात जास्त 16 मेडल शूटिंगमध्ये जिंकले आहेत.


  संजीवने कॉमनवेल्थ गेम्समध्ये बनवला रेकॉर्ड
  - संजीव राजपूतने नीलिंग (150.5), प्रोन (156.4) आणि स्टँडिंग एलिमिनेशन (147.6) मिळून एकूण 454.5 गुण मिळवले. हा कॉमनवेल्थ गेम्सचा एक नवा रेकॉर्डही आहे.
  - संजीवच्या आधी हा रेकॉर्ड इंग्लंडच्या डॅनियल रिव्हर्सच्या नावे होता. त्याने ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 452.9 अंक मिळवले होते.

  जेवलिन थ्रो (फाइनल): सुरुवातीपासूनच आघाडीवर होता नीरज चोप्रा
  - नीरज चाेप्राने फायनलमध्ये सुरुवातीपासूनच लीड घेतली होती. पहिल्या प्रयत्नात त्याने जेवलिनने 85.5 मीटरचे अंतर गाठले. दूसऱ्या प्रयत्नात फाउल ठरला. तिसऱ्यामध्ये 84.78, चौथ्यात 86.47 आणि पाचव्यात 83.48 मीटरचे अंतर गाठले.
  - याप्रकारे 86.47 मीटरच्या स्कोअरसोबत गोल्ड मेडलवर नीरजने कब्जा केला. नीरजची ही पहिलीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेे.

  पदक तालिका: टॉप 5 देश

  देश गोल्ड सिल्व्हर ब्राँझ एकूण
  ऑस्ट्रेलिया 69 50 55 174
  इंग्लंड 34 35 37 106
  भारत 20 13 14 47
  कॅनडा 14 35 26 75
  दक्षिण अाफ्रिका 13 10 12

  35

  * ही तालिका भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी 10:00 वाजेपर्यंत अपडेट आहे.

 • Commonwealth Games Day 10 Shooting, Squash, TT, Hockey And News And Updates

Trending