आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Trolling Vinay Kumar For His Expensive Bowling Vs CSK Match In IPL 2018

SRK च्या टीमने गमावला हातातोंडाला आलेला विजयाचा घास, आता उडतेय अशी खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्टस डेस्क- IPL 2018 मध्ये मंगळवारी रात्री टूर्नामेंटमधील पाचवी मॅच खेळली गेली. ज्यात चेन्नई सुपरकिंग्सने कोलकाता नाईटरायडर्सला 5 विकेटने हरविले. अतियश रोमांचक ठरलेल्या या मॅचचा निकाल शेवटच्या ओवरमध्ये झाला. ज्यात चेन्नईला 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावोने दोघांनी मिळून या धावा काढल्या. 

 

शेवटचे षटक विनय कुमारने टाकले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर ब्रावोने सिक्स मारला तसेच तो नो बॉल ठरला. त्यानंतर पुढील सहा चेंडूवर दोन्ही फलंदाजांनी 10 धावा सहज काढल्या. पाचव्या चेंडूवर जडेजाने विनिंग सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. मॅचमध्ये केकेआरच्या पराभवानंतर फॅन्सचा राग सोशल मीडियात चांगलाच निघाला.

 

फॅन्सने या पराभवाला विनय कुमारला जबाबदार धरत त्याला चांगलेच फटकारले. विनय कुमारने या मॅचमध्ये 1.5 षटकात बॉलिंग करताना 19.09 च्या इकोनॉमीने 35 धावा दिल्या. विजयाच्या जवळ आले असताना पराभव पत्कारावा लागल्याने नाराज फॅन्सने यावरून चांगलाच राग व्यक्त केला.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, केकेआरच्या पराभवानंतर विनय कुमारवरून आलेल्या कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...