Home | Sports | From The Field | Cricket Fans Trolls Delhi Daredevils Team After Defeat Against Rajasthan Royals

IPL मॅचमध्ये राजस्थानकडून दिल्लीचा पराभव, सोशल मीडियात उडाली अशी खिल्ली

दिव्यमराठी वेब टीम | Update - Apr 12, 2018, 10:52 AM IST

IPL 2018 मध्ये बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या सहाव्या लढतीत राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेयरडेविल्सला 10 धावांनी (DRS नियम

 • Cricket Fans Trolls Delhi Daredevils Team After Defeat Against Rajasthan Royals

  स्पोर्ट्स डेस्क- IPL 2018 मध्ये बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या सहाव्या लढतीत राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेयरडेविल्सला 10 धावांनी (DRS नियमानुसार) हरविले. या विजयासह टूर्नामेंटमध्ये राजस्थानने आपल्या विजयाचे खाते खोलले. तर, दिल्लीचा सलग दुसरा पराभव झाला. यानंतर सोशल मीडियात क्रिकेट फॅन्सनी DD ची खिल्ली उडविली. सलामीला न खेळणा-या दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरची फॅन्सनी चांगलीच फिरकी घेतली. तसेच त्याला घाबरट म्हणाले. पावसाने केले दिल्लीचे नुकसान....

  - प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 17.5 षटकांत 5 बाद 153 धावा केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने खेळ थांबला.
  - राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने 40 चेंडूत 45 धावा केल्या. स्टोक्सने 16, संजू सॅमसनने 37, बटलरने 29 धावा काढल्या.
  - राहुल त्रिपाठी नाबाद 15 आणि के. गौतम 2 धावांवर नाबाद राहिला. शाहबाज नदीमने 2 गडी टिपले.
  - त्यानंतर डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे दिल्लीला 6 षटकांत 71 धावांची लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात दिल्ली संघ 6 षटकांत 4 बाद 60 धावाच करू शकला.
  - सलामीवीर कॉलिन मुनरो भोपळाही फोडू शकला नाही. सलामीवीर ग्लेन मॅक्सवेल 12 चेंडूत 2 चौकार व एक षटकार खेचत 17 धावांवर परतला.
  - यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 20 धावा ठोकल्या. विजय शंकर 3 धावांवर बाद झाला. क्रिस मॉरिसने नाबाद 17 धावा केल्या.
  - राजस्थानच्या जयदेव उनाडकटने एक आणि लाफलिनने 20 धावांत 2 गडी बाद केले.

  पुढे स्लाईडद्वारे पाहा, दिल्लीच्या पराभवानंतर सोशल मिडियात काय काय आल्या प्रतिक्रिया....

Trending