Home | Sports | From The Field | Cricket World cup First Match Sunil Gavskar Batting

WorldCupच्या पहिल्या सामन्यात सुनील गावसकरांची ऐतिहासिक खेळी, 138 चेंडूवर 0 रन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 08, 2018, 07:11 PM IST

7 जून 1975 रोजी क्रिकेट वर्ल्डकपचा पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी आपल्या करिअ

 • Cricket World cup First Match Sunil Gavskar Batting

  7 जून 1975 रोजी क्रिकेट वर्ल्डकपचा पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी आपल्या करिअरमधील सर्वात धिम्यागतीची खेळी खेळली होती.

  क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात 1975 मध्ये झाली होती. तेव्हा त्याला 'प्रुरुडेंशियल कप' नाव दिले गेले होते. मर्यादित षटकांची क्रिकेटची ही पहिली टुर्नामेंट होती. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्टइंडीज, श्रीलंका आणि पूर्व अफ्रिकेचा समावेश होता. पहिला सामना 7 जून 1975 रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. हा ऐतिहासिक सामना लक्षात राहाला तो भारतीय फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्या फलंदाजीमुळे. लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी या वने डे मॅचमध्ये त्यांच्या करिअरमधील सर्वात धिम्या गतीने फलंदाजी केली होती.

  पहिल्या सामन्यात भारताला डोंगराऐवढे लक्ष्य
  - भारतीय संघ इंग्लंड, न्यूझीलंड आणि पूर्व अफ्रिकेसोबत ए ग्रुपमध्ये होता. भारतीय संघाचा पहिला समाना यजमान इंग्लंडसोबत होता. इंग्लिश कॅप्टनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी निर्धारित 60 षटकांमध्ये 334 रन केले होते. इंग्लंडकडून सर्वाधिक 137 रन एमिसने केले होते. भारतासमोर विजयसाठी 335 रन्सचे लक्ष्य होते.

  गावसकर 138 डॉट बॉल
  - भारताकडून सुनील गावसकर आणि एकनाथ सोलकर यांनी ओपनिंग केली होती. सोलकर 8 रन काढून अर्नाल्डच्या चेंडूवर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या बाजूने गावसकर टिकून होते. असे वाटत होते की जणू नॉट आऊटचे वरदान घेऊनच ते मैदानात उतरले आहेत.
  - एका बाजूला भारताच्या विकेट पडत होत्या तर दुसऱ्या बाजूला गावसकर जराही विचलीत न होता 60 षटके फलंदाजी करत होते. 60 षटके गावसकर मैदानावर टिकून होते, परंतू ते भारताला विजयी मिळवून देऊ शकले नाही. असे असले तरी या पहिल्याच सामन्यातील त्यांच्या खेळीने विक्रम केला होता.
  - गावसकरांनी 174 चेंडूंचा समान करुन 36 रन केले होते. त्यातील 138 चेंडू हे डॉट होते. गावसकरांच्या या धिम्या गतीच्या खेळीची संपूर्ण क्रिकेट जगतात चर्चा होती.

 • Cricket World cup First Match Sunil Gavskar Batting

Trending