आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डुमिनी, क्लासेनचे अर्धशतक; आफ्रिकेचा 6 गड्यांनी विजय; आफ्रिकेची 1-1 ने बरोबरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन- कर्णधार डुमिनी आणि क्लासेनच्या अर्धशतकाच्या बळावर दक्षिण अाफ्रिकने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ६ गड्यांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अाफ्रिकेने १८.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.


द. आफ्रिकेच्या कर्णधार डुमिनीने ४० चेंडूत ६४ धावा केल्या. जोरदार फटकेबाजी करत हेनरिक क्लासेनने ३० चेंडूत ३ चौकार व ७ षटकार खेचत ६९ धावा ठोकल्या. डेव्हिड मिलर ५ धावांवर परतला.  बेहार्डिन १६ धावांवर नाबाद राहिला. भारताच्या जयदेव उनाडकटने ४२ चेंडूत २ आणि शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक बळी घेतला.


तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १८८ धावा उभारल्या. यात सलामीवीर शिखर धवन २४ धावा करून परतला. दुसरा सलामीवीर शिखर धवनला दालाने भोपळाही फोडू दिला नाही. सुरेश रैनाने २४ चेंडूंत ३१ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली अवघ्या एका धावेवर असताना दालाने त्याला बाद केले. त्यानंतर संघाची सूत्रे आपल्या हाती घेत मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने नाबाद अर्धशतके ठोकली. पांडेने ४८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचत नाबाद ७९ धावा काढल्या. धोनीने २८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार लगावत नाबाद ५२ धावा ठोकल्या. त्याने आपल्या करिअरमधील दुसरे अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या दालाने २८ धावांत २ गडी बाद केले. डुमिनी व फहलुकवेओने प्रत्येकी एक विकेट घेतली.   

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...