आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडचा सलग सहावा मालिका विजय; न्यूझीलंड टीम पराभूत, वनडे मालिका 3-2 ने जिंकली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्राइस्टचर्च- माेर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड टीमने शनिवारी न्यूझीलंडवर मालिका विजय संपादन केला. जाॅनी ब्रेयस्ट्राे (१०४) अाणि हेल्सच्या (६१) झंझावाती खेळीच्या बळावर इंग्लंडने  मालिकेतील पाचव्या अाणि शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली. इंग्लंडने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह इंग्लंडच्या टीमने पाच वनडे सामन्यांची मालिका ३-२ ने अापल्या नावे केली.  शानदार शतकी खेळी करणारा ब्रेयस्ट्राे सामनावीर अाणि वाेक्स मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या दाेघांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली.  


न्यूझीलंडच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना  इंग्लंडसमाेर विजयासाठी २२४ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या टीमने ३ गड्यांच्या माेबदल्यात ३२.४ षटकांत सामना जिंकला. यासह इंग्लंडला ही मालिका अापल्या नावे करता अाली.   


धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला सलामीच्या ब्रेयस्ट्राे अाणि हेल्सने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी न्यूझीलंडच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेत पहिल्या गड्यासाठी १५५ धावांची भागीदारी केली. यासह त्यांनी टीमच्या विजयाचा मजबूत पाया रचला. दरम्यान, इंग्लंडच्या हेल्सने ७४ चेंडूंत ९ चाैकारांसह ६१ धावा काढल्या.

 

वाेक्स, रशीदची धारदार गाेलंदाजी 
इंग्लंडच्या वाेक्स व रशीदने प्रत्येकी तीन गडी बाद केले. वाेक्सने १० षटकांत ३२ धावा देत ३ विकेट घेतल्या. रशीदने  ४२ धावा देऊन तीन बळी घेतले. वूड अाणि माेईन अलीने प्रत्येकी एक बळी घेतला.

 

इंग्लंडचा मालिका विजयाचा षटकार 
गत वर्षी जानेवारी २०१७ पासून अाजतागत इंग्लंडच्या टीमने अापला मालिका विजयाची माेहिम अबाधित ठेवली. यादरम्यान इंग्लंडच्या टीमने सलग सहा मालिका विजय संपादन केल्या अाहेत. 

 

ब्रेयस्ट्राेचे वेगवान शतक 
 सलामीवीर ब्रेयस्ट्राेने झंझावाती खेळी करताना ५२ चेंडूंमध्ये शतक ठाेकले. त्याने ६० चेंडूंत १०४ धावा काढल्या. यात ९ चाैकार अाणि ६ षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. यासह त्याने इंग्लंडकडून सर्वात वेगवान तिसरे शतक ठाेकले. यापूर्वी, जाेस बटलरने ४६ अाणि माेईन अलीने ५३ चेंडूंत वेगवान शतक झळकावले अाहे. अाता हा पराक्रम ब्रेयस्टाेने गाजवला.

 

सॅटनरचे अर्धशतक  
न्यूझीलंडकडून अाठव्या स्थानावर अालेल्या मिशेल सॅटनरने झंझावाती खेळी केली. त्याने टीमकडून सर्वाधिक ६७ धावा काढल्या. त्याने ७१ चेंडूंत ४ चाैकार व २ षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. अाठव्या स्थानावर फलंदाजी करताना सॅटनरची ही माेठी खेळी ठरली.

बातम्या आणखी आहेत...