आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायसीसीच्या सर्वाेत्कृष्ट संघात भारताचे पाच युवा; पृथ्वी शाॅसह चौघांचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- युवांच्या खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर भारताला चाैथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळाला. यातूनच भारताच्या या युवांनी जागतिक स्तरावर अापल्या कर्तृत्वाची छाप पाडली. यामुळे भारताच्या पाच युवांना अायसीसीच्या सर्वाेत्कृष्ट १९ वर्षांखालील संघात मानाचे स्थान मिळाले. यामध्ये विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शाॅसह मनज्याेत कार्ला, शुबमान गिल, युवा गाेलंदाज अनुकूल राॅय अाणि कमलेश नागरकाेटीचा समावेश अाहे. अायसीसीने  अापल्या  सर्वाेत्कृष्ट संघाची घाेषणा केली.  दक्षिण अाफ्रिकेच्या रेयाॅनार्ड वान टाेंडरकडे  नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली.  

  
 अायसीसीच्या सर्वाेत्कृष्ट युवा संघातील अाघाडीच्या फळीमध्ये भारताच्या तीन जणांची निवड झाली. यामध्ये पृथ्वी शाॅ (२६१ धावा), मनज्याेत कार्ला (२५२ धावा) अाणि शुबमान गिल (३७२धावा) यांचा समावेश अाहे. या तिघांचीही वर्ल्डकपमधील फलंदाजी उल्लेखनीय ठरली. त्यांचे भारतीय संघाच्या विजयात माेलाचे याेगदान ठरले.   


भारताचे सर्वाधिक युवा
अायसीसीच्या सर्वाेत्कृष्ट संघात भारताच्या युवांचा दबदबा राहिला. यामध्ये सर्वाधिक पाच भारतीय युवा अाहेत. त्यापाठाेपाठ दक्षिण अाफ्रिकेच्या तीन युवांची निवड झाली. न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या प्रत्येकी एका युवाला स्थान मिळवता अाले.   


युवा संघ : पृथ्वी, मनज्याेत , शुबमान (भारत), फिन अॅलेन (न्यूझीलंड), रेयाॅनार्ड वान टाेंडर (कर्णधार), वाडिले  ( द. अाफ्रिका), अनुकूल राॅय, कमलेश (भारत), गेराल्ड (द.अाफ्रिका), अहमद (अफगाणिस्तान), शाहिन (पाकिस्तान).

बातम्या आणखी आहेत...