आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमान विदर्भाने रचला इतिहास; 28 वर्षांनंतरचा विक्रम केला ब्रेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- फाॅर्मात असलेल्या रणजी चॅम्पियन विदर्भाने शनिवारी इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत विक्रमी धावसंख्या उभारण्याची एेतिहासिक कामगिरी केली. विदर्भाने अापल्या घरच्या मैदानावर करुण नायरच्या शेष भारतविरुद्ध विक्रमी ८०० धावा काढल्या. टीमने ७ गडी गमावून डाव घाेषित केला. यासह विदर्भाने तब्बल २८ वर्षांनंतर या स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या रचण्याचा विक्रम रचला. वसीम जाफरचे (२८६) झंझावाती द्विशतक अाणि अपूर्व वानखेडेच्या (१५७) नाबाद दीड शतकाच्या बळावर विदर्भाने विक्रमाला गवसणी घातली. प्रत्युत्तरात शेष भारताची निराशाजनक सुरुवात झाली. गुरबानीच्या (४/४६) धारदार गाेलंदाजीमुळे दमछाक झालेल्या शेष भारताने दिवसअखेर ६ बाद २३६ धावा काढल्या. अाता विदर्भाला विजयासाठी चार विकेटची गरज अाहे. अद्याप ५६४ धावांनी पिछाडीवर असलेल्या शेष भारताकडे केवळ चार विकेट शिल्लक अाहेत. विहारी (८१) अाणि जयंत यादव (६२) हे दाेेघे मैदानावर खेळत अाहेत.   


विदर्भाकडून अपूर्व वानखेडेने तुफानी खेळी केली. त्याने २२१ चेंडूंचा सामना करताना १६ चाैकार व ६ षटकारांच्या अाधारे नाबाद १५७ धावा काढल्या.

 

शेष भारताचाच विक्रम माेडला
विदर्भाने  इराणी चषकात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला. यादरम्यान विदर्भाने शेष भारताचाच १९९० मधील विक्रमाला मागे टाकले. शेष भारताने २८ वर्षांपूर्वी  बंगालविरुद्ध ७३७ धावांचा विक्रम रचला हाेता. अात विदर्भाने ८०० धावसंख्येचा विक्रम रचला.