आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट्स डेस्क - इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (आईसीसी) ने गुरुवारी त्यांच्या सर्व 104 सदस्य देशांना टी-20 इंटरनॅशनल स्टेट्स दिले. या सर्व देशांसाठी ग्लोबल रँकिंग सिस्टीमही आणले जाणार आहे. सध्या टी-20 दर्जा असलेले 18 देश आहेत. त्यापैकी 12 फुल मेंबरशिवाय स्कॉटलंड, नंदरलंड, हाँगकाँग, यूएई, ओमान आणि नेपाळ यांचाही समावेश आहे. पुढचा टी-20 वर्ल्डकप 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला जाईल.
आईसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी कोलकात्यात पत्रकार परिषदेत सांगितले की, 104 देशांच्या महिला आणि पुरुष टीमना स्वतंत्र मान्यता दिली जाईल. महिला टीमना 1 जुलैपासून तर पुरुषांच्या टीमला पुढल्या वर्षी 1 जानेवारीला दर्जा दिला जाईल.
चैम्पियंस ट्रॉफीबाबत संशय
2017 नंतरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच असे अंदाज लावण्यात येत होते की, ही स्पर्धा बंद केली जाऊ शकते. त्यावर रिचर्डसन म्हणाले की, 2021 ची चॅम्पियन्स ट्रॉफी टी-20 फॉरमॅटमध्ये होऊ शकते. आयसीसीच्या सीईओंनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत म्हटले की, आपल्या सर्वांनाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यासाठी एक व्हावे लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला राजी करण्यासाठी आपल्याकडे चांगली संधी असेल असे वाटते.
बॉल टेम्परिंग आणि स्लेजिंग केल्यास कारवाई
रिचर्डसन म्हणाले, अभद्र भाषेचा वापर, स्लेजिंग आणि बॉल टेम्परिंग केल्यात कडक कारवाई केली जाईल. फक्त दंड लावून काम भागणार नाही. अॅलन बॉर्डर, शॉन पोलॉक यांची क्रिकेट कमिटी सध्या याबाबत एका प्लानवर काम करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.