आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायसीसी कसाेटी क्रमवारी; विराट काेहलीची तिसऱ्या स्थानी घसरण, हार्दिक, भुवनची प्रगती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीसह काही दिग्गजांना दाैऱ्यात यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सलामीच्या कसाेटीतील सुमार खेळीचा माेठा फटका बसला अाहे. या सुमार कामगिरीमुळे या खेळाडूंची अायसीसीच्या कसाेटी क्रमवारीत माेठी घसरण झाली. यात काेहलीचे माेठे नुकसान झाले. त्याची कसाेटी फलंदाजाच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. तसेच चेतेश्वर पुजाराचे एका स्थानाने नुकसान झाले. यामुळे त्याची पाचव्या स्थानावर घसरण झाली अाहे. नुकतीच अायसीसीने कसाेटी क्रमवारी जाहीर केली. साेमवारी यजमान अाफ्रिकेने  घरच्या मैदानावर सलामीच्या कसाेटीत भारताचा पराभव केला. अाफ्रिकेने ७२ धावांनी सलामीची कसाेटी जिंकली.     


भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहली सलामीच्या कसाेटीत सपशेल अपयशी ठरला. त्याने या कसाेटीत एकूण ३३ धावा काढल्या. यात पहिल्या डावातील ५ अाणि दुसऱ्या डावातील २८ धावांचा समावेश अाहे. त्यामुळे त्याचे १३ रेंटिंग गुणांनी क्रमवारीत नुकसान झाले. त्याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. अाता त्याचे एकूण ८८० गुण झाले.  अॅशेस मालिकेतील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर इंग्लंडच्या ज्याे रुटने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. 


भुवनेश्वर कुमार २२ व्या स्थानावर
गाेलंदाजीमध्ये भारताच्या भुवनेश्वर कुमारला करिअरमधील सर्वाेत्कृष्ट स्थान गाठता अाले. त्याने २२ व्या स्थानावर धडक मारली. त्याला ८ स्थानांनी प्रगती साधता अाली. रवींद्र जडेजा तिसऱ्या अाणि अश्विन चाैथ्या स्थानावर कायम अाहे.   


हार्दिकची प्रगती; टाॅप-५० मध्ये 
सलामीच्या कसाेटीत भारताच्या विजयासाठी युवा खेळाडू हार्दिक पांड्याने एकाकी झुंज दिली. त्याने पहिल्या डावात ९३ धावांची शानदार खेळी केली. त्याने संघाकडून सर्वाधिक धावा काढल्या. याच खेळीमुळे भारताला २००  धावांचा अाकडा पार करता अाली. त्याची ही खेळी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे त्याला क्रमवारीतही प्रगती साधता अाली.  त्याला २४ स्थानांना फायदा झाला. त्यामुळे त्याने ४९ वे स्थान गाठले.  यामुळे त्याला टाॅप-५० मध्ये स्थान मिळवता अाले.  


रबाडा अव्वलस्थानी 
कागिसाे रबाडाने अाफ्रिकेच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. यामुळे त्याला गाेलदंाजीत जगातील नंबर वनचे सिंहासन गाठता अाले. त्याने ८८८ गुणांची कमाई करताना  अँडरसनवर कुरघाेडी केली व अव्वल स्थान गाठले. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, टाॅप-5... 

बातम्या आणखी आहेत...