आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका: श्रीलंकेवर 2 गड्यांनी मात; बांगलादेश फायनलमध्ये,उद्या भारतविरुद्ध झुंजणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे- यजमान श्रीलंकेचे अाव्हान संपुष्टात अाणून बांगलादेश संघाने शुक्रवारी टी-२० तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये दिमाखदारपणे प्रवेश केला. बांगलादेशने उपांत्य सामन्यात श्रीलंकेवर दाेन गड्यांनी मात केली. तमीम इकबाल (५०) अाणि सामनावीर महमुुद्दुल्लाह (नाबाद ४३) यांच्या झंझावाताच्या बळावर बांगलादेशने फायनलचे तिकीट संपादन केले. अाता अंतिम सामन्यात भारत  अाणि बांगलादेश संघ ट्राॅफीसाठी रविवारी झंुजतील. 


प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ७ बाद १५९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने ८ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विजयाचे लक्ष्य सहज गाठले. सामनावीर महमुद्दुल्लाहचे संघाच्या विजयात माेलाचे याेगदान ठरले. धावांचा पाठलाग करणाऱ्या इकबालने बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली.  लिटाेन दास (०) अाल्यापावली पॅव्हेलियनमध्ये परतला. तसेच शब्बीरने १३ धावांचे याेगदान दिले.  


कुशल परेरा, तिसाराची खेळी व्यर्थ : श्रीलंका टीमकडून कुशल परेरा (६१) व कर्णधार तिसारा परेराने (५८) एकाकी झंुज देत केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. त्यांनी ९७ धावांची भागीदारी रचली. 

 

इकबाल-मुशफिकूरची भागीदारी

सलामीवीर इकबाल व मुशफिकूर रहीमने बांगलादेशच्या विजयाचा मजबूत पाया रचला. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, मुशफिकूरने २८ धावांचे याेगदान दिले.

 

इकबालचे अर्धशतक
सलामीच्या तमीम इकबालने एकाकी झुंज देताना शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना ४ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ५० धावा काढल्या. यासह त्याने टीमच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याची सामन्यातील कामगिरी उल्लेखनीय ठरली.

बातम्या आणखी आहेत...