आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-श्रीलंका अाज सामना; सलग दुसऱ्या विजयासाठी अाता भारतीय संघाचे खेळाडू उत्सुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे- सलगच्या मालिका विजयाने यंदाच्या सत्रातही फाॅर्मात असलेल्या भारतीय संघाचे अाता तिरंगी मालिका अापल्या नावे करण्याचे लक्ष्य अाहे. गत सामन्यातील विजयाने टीम इंडिया मालिकेमध्ये विजयी ट्रॅकवर परतली अाहे. याच विजयाने युवांचा अात्मविश्वास द्विगुणित झाला. अाता अापली विजयी लय कायम ठेवण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाचा मालिकेतील तिसरा सामना साेमवारी यजमान श्रीलंकेशी हाेईल. अाता  पराभवाची परतफेड करून मालिका विजयाचा अापला दावा अधिक मजबूत करण्याची भारताला संधी अाहे.  यासाठी अाता टीमच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. राेहितच्या नेतृत्वाखाली भारताने गत सामन्यात बांगलादेशवर मात केली. यासह टीमने मालिकेत पहिल्या विजयाची नाेंद केली.  सलामीला श्रीलंकेकडून भारताला पराभव पत्करावा लागला हाेता.   

 
शिखर धवनच्या अर्धशतकामुळे भारताला गत सामन्यात विजयाची नाेंद करता अाली. अाता हीच लय अागामी सामन्यातही कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. फलंदाजीमध्ये सध्या भारताचे पारडे जड मानले जात अाहे. शिखर धवनपाठाेपाठ युवा फलंदाजही फाॅर्मात अाहेत. 

 

श्रीलंका अव्वलस्थानी 
गत सामन्यातील पराभवानंतरही श्रीलंकन टीमने गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले. अाता श्रीलंकेच्या नावे दाेन सामन्यांत एका विजयासह ०२ गुण अाहेत. त्यापाठाेपाठ टीम इंडिया अाणि बांगलादेश प्रत्येकी दाेन गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर अाहे.   

 

 

संभाव्य संघ 
भारत :
राेहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लाेकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वाॅशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकत, माे. सिराज, ऋषभ पंत.  
श्रीलंका : चांदिमल (कर्णधार), सुरंगा लकमल, उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलका,  कुशल मेंडिस, तिसारा परेरा, दासून शनाका, कुशल परेरा, उदाना, धनंजया, अमिलाे अपाेन्साे, नुवान प्रदीप, चामिरा, डिसिल्वा.

 

भारतीय महिलांचे विजयाचे लक्ष्य; अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका अाजपासून

अाफ्रिका दाैऱ्यात सलग दाेन मालिका विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय महिला संघ अाता घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सिरीज जिंकण्यासाठी सज्ज अाहे. भारत अाणि अाॅस्ट्रेलिया महिला संघातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला साेमवारपासून सुरुवात हाेत अाहे. यातील सलामीचा सामना वडाेदरा येथील मैदानावर हाेईल.   


मिताली राजच्या नेतृत्वाखाली यजमान भारताचा महिला संघ मैदानावर उतरणार अाहे. संघात महाराष्ट्राची युवा फलंदाज स्मृतीचा समावेश अाहे.

बातम्या आणखी आहेत...