आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने दक्षिण आफ्रिकेवर मिळवला 26 वर्षांतील सर्वात मोठा विजय; 9 गड्यांनी जिंकला सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन- सलामीच्या विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या टीम इंडियाने रविवारी सलग दुसऱ्या वनडेत यजमान दक्षिण अाफ्रिकेला धूळ चारली. भारतीय संघाने ९ गड्यांनी दुसऱ्या वनडेत धडाकेबाज विजयाची नाेंद केली. यासह भारताने अाफ्रिका दाैऱ्यात सलग तिसऱ्या विजयासह हॅट््ट्रिक नाेंदवली. यात तिसऱ्या कसाेटीसह दाेन वनडेतील विजयाचा समावेश अाहे.   

शिखर धवन (५१) अाणि विराट काेहलीच्या (४६) अभेद्य ९३ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने २०.३ षटकांत सामना जिंकला. यासह भारताने यजमान अाफ्रिकेविरुद्ध सहा वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसरा वनडे सामना बुधवारी केपटाऊनच्या मैदानावर रंगणार अाहे.   

 

भारताने द. आफ्रिकेवर मिळवला २६ वर्षांतील सर्वात मोठा विजय
- आफ्रिकेचा मायभूमीत सर्वात कमी स्कोअर, ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
- 118 धावा ही दक्षिण आफ्रिकेने मायभूमीत केलेली आजवरची सर्वात कमी धावसंख्या
- 67 धावा जोडताना द. आफ्रिकेचे ९ बळी गेले. दुसरी विकेट धावसंख्या ५१ असताना पडली होती.
- शिखर धवनने ५१ धावा, विराट कोहलीने ४६ धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले.


टॉकिंग पॉइंट : विजयातील सर्वोत्कृष्ट
1. भारताचा ९ विकेटनी सर्वात मोठा विजय
2. आफ्रिका 118, देशात सर्वात कमी स्कोअर
3. यजुवेंद्रने ५/२२ बळी, कारकीर्दीत सर्वोत्कृष्ट
4. कुलदीप ३/२० बळी, ८ महिन्यांत सर्वोत्कृष्ट
5. १७७ चेंडू शिल्लक, सर्वात मोठा विजय


युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहलच्या (५/२२) फिरकीच्या जाळ्यात अडकल्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या अाफ्रिकेचा ३२.२ षटकांत अवघ्या ११८ धावांत धुव्वा उडाला. प्रत्युत्तरात भारताने एका गड्याच्या माेबदल्यात विजयाचे अावाक्यातले लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात सलामीवीर राेहित शर्माने १५ धावांचे महत्त्वाचे याेगदान दिले.   


धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून राेहित शर्माने शिखर धवनसाेबत चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी रचली. माेठ्या खेळीच्या प्रयत्नात असलेल्या राेहितला कागिसाे रबाडाने झेलबाद केले. राेहितने १७ चेंडूंत दाेन चाैकार व एक उत्तंुग षटकारासह १५ धावांची खेळी केली.   


त्या निर्णयावर काेहली भडकला
टीम इंडियाचा विजय अवघ्या दाेन धावांवर असताना पंचांनी लंच ब्रेकचा निर्णय घेतला. याच निर्णयावर टीम  विराट काेहली भडकला.


काेहली-धवनने केली विजयी भागीदारी  
फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीने सलामीच्या धवनसाेबत अाफ्रिकेच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. यासह या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य ९३ धावांची भागीदारी रचली. यातून त्यांनी भारताचा झटपट विजय निश्चित केला. दरम्यान, शिखर धवनने शानदार अर्धशतक साजरे केले. त्याने ५६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा काढल्या. यात ९ चाैकारांचा समावेश अाहे. तसेच काेहलीने ५० चेंडूंचा सामना करताना चार चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे नाबाद ४६ धावांची खेळी केली.   


यजुवेंद्र चहलच्या फिरकीचा विक्रम 
भारताच्या यजुवेंद्र चहलने अापल्या फिरकीच्या बळावर यजमान  अाफ्रिकेविरुद्धचा सामना गाजवला. त्याने शानदार गाेलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. यासह त्याने भारताकडून फिरकीपटू म्हणून पाच विकेट घेण्याचा अाफ्रिकेत विक्रम रचला. त्याने अवघ्या २२ धावा देताना हे यश संपादन केले. त्यापाठाेपाठ कुलदीप यादवनेही शानदार गाेलंदाजी केली. त्याने तीन गडी बाद केले. तसेच भुवनेश्वर अाणि बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.   

बातम्या आणखी आहेत...