आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका: भारताची श्रीलंकेवर मात; श्रीलंकेचा सलग दुसरा पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे- शार्दूल ठाकूरच्या (४/२७) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ मनीष पांडे (नाबाद ४२) अाणि दिनेश कार्तिक (३९) यांच्या अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने साेमवारी तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय संपादन केला. भारताने मालिकेतील अापल्या तिसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात केली. यासह भारताने यजमानांना सलामीच्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. चार विकेट घेणारा शार्दूल ठाकूर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 


या विजयासह भारताने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर धडक मारली. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. दुसरीकडे श्रीलंकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. अाता भारताचा मालिकेतील चाैथा सामना बुधवारी बांगलादेश टीमशी हाेईल. शुक्रवारी श्रीलंका अाणि बांगलादेश संघ समाेरासमाेर असतील. 


श्रीलंकेने प्रथम फलदंाजी करताना भारतासमाेर १५३ धावांचे अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात भारताने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली. मनीष व कार्तिकने भागीदारीच्या बळावर  हे यश मिळवून दिले. रैना (२८), राहुल (१७) व राेहितनेही (११) विजयात याेगदान दिले.

 

मनीष-कार्तिकने केली विजयी भागीदारी 
भारताच्या विजयामध्ये युवा फलंदाज मनीष पांडे अाणि दिनेश कार्तिक ही जाेडी चमकली. त्यांनी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यांनी  विजय मिळवून दिला. मनीषने ३१ चेंडूंचा सामना करताना ४२ धावा काढल्या. दिनेश कार्तिकने २५ चेंडूंत नाबाद ३९ धावांची खेळी केली. 

 

शार्दूलचे चार बळी
भारताकडून शार्दूल ठाकूरने धारदार गाेलंदाजी केली. त्याने चार षटकांत २७ धावा देताना चार विकेट घेतल्या. तसेच सुंदरने २१ धावा देऊन दाेन बळी घेतले. दरम्यान, यजुवेंद्र , विजय शंकर व जयदेवही चमकले. त्यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला. 

 

मेंडिस- थरंगाने केली अर्धशतकी भागीदारी 
दाेन विकेट झटपट पडल्यानंतर संकटात सापडलेल्या श्रीलंकेचा डाव सावरण्यासाठी कुशल मेंडिसने कंबर कसली. या वेळी त्याला थरंगाची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी शानदार खेळी करत तिसऱ्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी रचली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो आणि धावफलक...

बातम्या आणखी आहेत...