आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा नुई ICC च्या पहिल्या इंडिपेंडेंट महिला डायरेक्टर, कॉलेजमध्ये खेळत होत्या क्रिकेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेप्सिकोच्या चेअरमन आणि सीईओ इंदिरा नूई इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल(ICC) च्या पहिल्या इंडिपेंडेंट महिला डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. इंदिरा नुई जून 2018 मध्ये आयसीसीच्या बोर्डमध्ये सहभागी होतील. जून 2017 मध्ये आयसीसीने इंडिपेंडेंट महिला डायरेक्टरच्या नियुक्तीची परवानगी दिली होती. इंदिरा नुईंची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. पण टर्म पूर्ण केल्यानंतर त्यांची पुन्हा नियुक्ती केली जाऊ शकते. 


माझे क्रिकेटवर प्रेम..
इंदिरा नुई म्हणाल्या, माझे क्रिकेटवर प्रेम आहे. कॉलेजच्या दिवसांमध्ये मी क्रिकेट खेळायचे मी त्यातून खूप काही शिकले आहे. आसीसीबरोबर संलग्न झाल्याने मी खूप आनंदी आहे. बोर्ड, आयसीसी पार्टनर आणि क्रिकेटर्सना भेटून काम करण्याची वाट पाहत आहे. 


आयसीसीचे ऑपरेशन्स सुधारतील - मनोहर 
- आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले की, आणखी एक इंडिपेंडेंट डायरेक्टर आणि त्याही महिला नियुक्त केल्याने ICC चे गव्हर्नन्स आणखी सुधारेल. 
- ते म्हणाले, या पदासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू होता. त्यासाठी क्रिकेटप्रेमी असणे, व्यावसायिक क्षेत्राचा अुभव आणि आयसीसी किंवा इतर कोणत्याही संघटनेशी संबंध नसावा अशी अट ठेवण्यात आली होती. इंदिरा नुई पेप्सिको चेअरमन आहेत आणि कॉर्पोरेट वर्ल्डचा प्रसिद्ध चेहरा आहेत. त्यांच्यासारखी क्षमता असलेल्या व्यक्ती आयसीसीमध्ये असणे ही  जागतिक खेळासाठी आनंदाची बाब आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...