आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोहान्सबर्ग - भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यानचा सहा मॅचच्या वन डे मालिकेतील पाचवा सामना आज होत आहे. पोर्ट एलिजाबेथमध्ये हा सामना होत आहे. भारताने मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे. पण चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत चुरस कायम ठेवली. त्यामुळे सध्या मालिका 3-1 अशा फरकताने भारताकडे झुकलेली आहे. विराटसाठी सध्या दोन प्लेयर्सचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आङे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या असे त्यांचे नाव आहे. धोनीने वनडेमध्ये आतापर्यंत 9954 दावा केल्या आहेत. या मॅचमध्ये 46 धावा केल्यास त्याचे 10 हजार रन पूर्ण होतील.
सेंट जॉर्जमध्ये भारताने खेळले 5 सामने
- पोर्ट एलिजाबेथच्या सेंट जॉर्ज पार्कची विकेट बॅटिंगसाठी चांगली समजली जात आहे. पण याठिकाणी भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही.
- टीम इंडियाने येथे 1992 पासून आतापर्यंत पाच वनडे सामने खेळले असून पाचहीमध्ये पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने चार वेळा आणि एकदा केनियाकडून भारताचा पराभव झाला आहे.
- या खेळपट्टीची विकेट सुरुवातीला फास्ट बॉलर्सची मदत करते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सांभाळून फलंदाजी करावी लागेल.
भारतासाठी दुहेरी आव्हान
- चौथा वन डे सामना वगळता भारताचे दोन स्पिनर्स कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी वन डे सिरीजमध्ये आतापर्यंच चांगली गोलंदाजी केली आहे. चौथ्या मॅचमध्ये या जोडीला फारसे यश मिळालेले नाही. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार साऊथ आफ्रिकेला 28 ओव्हर्समध्ये 202 धावांचे आव्हान मिळाले होते. ते आफ्रिकेने पूर्ण केले.
- चौथ्या वन डेमध्ये रोहित लवकर आऊट झाला. पण नंतर शिखर आणि कोहलीने टीमला चांगली धावसंख्या उभारून दिली. कोहली धावांवर बाद झाला. त्यानंतर पुढच्या पाच विकेच अवघ्या 76 धावांवर कोसळल्या.
- राहणे, धोनी आणि पांड्याला विशेष कामगिरी करता आली नाही.
- चहल आणि कुलदीपला पाचव्या मॅचमध्ये चुका टाळाव्या लागतील. दोघांनी या सिरीजमध्ये आतापर्यंत 24 विकेट घेतल्या आहेत.
धोनी करू शकतो विक्रम
धोनीने या मॅचमध्ये 46 धावा केल्या तर त्याला वन डे मध्ये 10 हजार धावांचा विक्रम करण्याची संधी असेल. धोनी आतापर्यंत 316 वन डे खेळला आहे. 271 इनिंग्समध्ये त्याने 51.57 च्या सरासरीने 9954 धावा केल्या आहेत. त्यात 10 शतके आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वाधिक स्कोअर 183 आहे.
पाठलाग करणाऱ्याच्या विजयाची परंपरा
सेंट जॉर्ज पार्क या मैदानाचा विचार करता आतापर्यंत याठिकाणी 32 वन डे सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत त्यापैकी 17 वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे.
पाऊस होण्याची शक्यता
हवामान विभागानुसार मुताबिक, पोर्ट एलिजाबेथमध्ये मंगळवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याची शक्यता आङे. दुपारी मात्र वातावरण स्वच्छ असेल. तर रात्रीही ढगाळ हवामान असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.