आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Internet Sensation Priya Prakash Revealed Her Favourite Indian Cricketer

डोळा मारून लोकांना वेड लावणारी, या क्रिकेटरसाठी आहे क्रेझी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखिंयो से गोली मारे... अशा प्रिया प्रकाशचे सध्या देशभरात कोट्यवधी दिवाने आहेत. मल्याळम अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश वारियरला चित्रपटांसोबतच क्रिकेटचेही वेड आहे. प्रियाला क्रिकेट पाहाणे खूप आवडते. नुकतेच एका मुलाखतीत तिने सांगितले की तिचा फेव्हरेट क्रिकेटर टीम इंडियाचा माजी कॅप्टन एम.एस. धोनी आहे. एकीकडे लोक प्रियाचे दिवाने झाले आहे तर प्रिया माहीची दिवानी आहे. 

 

डोळ्यांच्या अदांनी केले अनेकांना घायाळ 
- सोशल मीडियावर प्रिया प्रकाशच्या व्हिडिओचा बोलबाला आहे. यामध्ये मुलांची संख्या मोठी असली तरी मुलीही तिच्या डोळ्यांच्या अदांवर फिदा आहेत. 
- अवघ्या 25-26 सेकंदांचा प्रिया प्रकाशचा व्हिडिओ एका रात्रीतून देशभरात हिट ठरला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांत प्रियाचे इंस्टाग्रामवर 12 लाख फॉलोअर्स झाले होते.
- पहिला व्हिडिओला अपेक्षापेक्षा कित्येकपट अधिक रिस्पॉन्स मिळाल्यानंतर प्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ लागलीच आला. 
- दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत क्लासरुममध्ये बसलेली असते. इतर विद्यार्थी अभ्यास करत असताना प्रिया मात्र दूर बसलेल्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत नजरेचा खेळ खेळत असते. 

बातम्या आणखी आहेत...