IPL: धाेनी-ब्राव्हाेचा झंझावात; चेन्नईचा बंगळुरूवर सुपर विजय, लीगमध्ये जिंकला 7वा सामना
कर्णधार महेेंद्रसिंग धाेनी (नाबाद ३१) अाणि ड्वेन ब्रव्होने (नाबाद १४) झंझावाती खेळीच्या अाधारे चेन्नई सुपरकिंग्ज संघाल
-
पुणे - कर्णधार महेेंद्रसिंग धाेनी (नाबाद ३१) अाणि ड्वेन ब्रव्होने (नाबाद १४) झंझावाती खेळीच्या अाधारे चेन्नई सुपरकिंग्ज संघाला शनिवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार सातवा विजय मिळवून दिला. यजमान चेन्नईने लीगमधील दहाव्या सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर मात केली. चेन्नईने घरच्या मैदानावर १८ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. चेन्नईचे सातव्या विजयाच्या अाधारे गुणतालिकेत अाता १४ गुण झाले अाहेत. बंगळुरू टीमचा लीगमधील हा सहावा पराभव ठरला अाहे. त्यामुळे अाता या संघासमाेर प्ले अाॅफमधील प्रवेशासाठीच्या अडचणीत वाढ झाली.
पार्थिव पटेलच्या (५३) अर्धशतकाच्या बळावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १२७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने चार गड्यांच्या माेबदल्यात १२ चेंडू राखून विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात सलामीवीर शेन वाॅटसनसह (११), अंबाती रायडू (३२) अाणि सुरेश रैनानेही (२५) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे चेन्नईला सहज विजय संपादन करता अाला.
धाेनी-ब्राव्हाेची तुफानी खेळी : चेन्नईच्या विजयासाठी कर्णधार महेंद्रसिंग धाेनी अाणि ब्राव्हाेने कंबर कसली. त्यांनी बंगळुरूच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना अभेद्य ४८ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी १८ षटकांत टीमचा विजय निश्चित केला. धाेनीने २३ चेंडूंचा सामना करताना एक चाैकार अाणि ३ षटकारांसह नाबाद ३१ धावा काढल्या.सामनावीर जडेजाने घेतल्या तीन विकेट
सामनावीर रवींद्र जडेजाने अापल्या घरच्या मैदानावर बंगळुरूविरुद्ध धारदार गाेलंदाजी केली. त्याने चार षटकांत १८ धावा देताना ३ बळी घेतले. त्यामुळे बंगळुरूचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपुरा ठरला. तसेच हरभजनने २ गडी बाद केले. एनगिडी अाणि व्हिलीने प्रत्येकी एक विकेट घेतली.पुढील स्लाईडवर पहा, धावफलक......
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
महेंद्रसिंह धोनीने यावर्षी 9 मॅचमध्ये 82.25 च्या सरासरीने 329 धावा केल्या आहेत. - फाइल
-