आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलकाता - ईडन गार्डनमध्ये आयपीएलच्या 18 व्या सामन्यामध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याने विजयासाठी पंजाबसमोर 192 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात पंजाबच्या के.एल.राहुल आणि ख्रिस गेल यांनी तुफान फटकेबाजी केली. पण नवव्या ओव्हरमध्ये पावसामुळे खेळ थांबला आहे.
पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय केला होता. पंजाबने मोहित शर्माऐवजी अंकित राजपूतला संघात स्थान दिले आहे. तर कोलकात्याने टीममध्ये काहीही बदल केलेला नाही. सध्या गुणतक्त्यात कोलकाता दुसऱ्या तर पंजाब चौथ्या स्थानी आहे. दोघांचे 6-6 पॉइंट्स आहेत. रन रेटच्या आधारावर कोलकाता पंजाबच्या पुढे आहे.
पंजाबचा डाव
>> 192 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांना तुफान फटकेबाजी केली.
>> सुरुवातीला के.एल. राहुलने फटकेबाजीला सुरुवात केली. तर नंतर युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध गेलही चांगलाच सुटला. त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
>> स्कोअर - पंजाब 5 ओव्हर्सनंतर बिनबाद 62 धावा (राहुल नाबाद 27, गेल नाबाद 34)
>> यानंतरही गेल आणि राहुलने फटेबाजी सुरू ठेवली. पण पावसामुळे खेळात व्यत्य आला.
>> पावसामुळे खेळ थांबला तेव्हा पंजाबच्या 8.2 ओव्हरमध्ये 96 धावा झाल्या होत्या.
कोलकात्याचा डाव
>> पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
>> दुसऱ्याच ओव्हरमध्ये कोलकात्याला पहिला धक्का बसला
>> मुजीब उर रेहमान याच्या गोलंदाजीवर सुनील नरेन बाद झाला.
>> सुनील नरेनला फक्त एकच धाव करता आली.
>> स्कोअर - कोलकाता 5 ओव्हर्समध्ये 1 बाद 42 (लिन नाबाद 21, उथप्पा नाबाद 18)
>> लिन आणि उथप्पा यांनी कोलकाताचा डाव सेट करण्यासाठी सुरुवातीला सावध फलंदाजी केली.
>> आठव्या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी फटकेबाजी केली. या ओव्हरमध्ये 23 धावा काढल्या.
>> नवव्या ओव्हरमध्ये कोलकात्याला दुसरा धक्का बसला
>> रॉबिन उथप्पा अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला त्याने 34 धावा केल्या.
>> दहाव्या ओव्हरमध्ये कोलकाताचा नितेश राणा धावबाद झाला. त्याला फक्त 3 धावा करता आल्या.
>> स्कोअर - कोलकाता 10 ओव्हर्समध्ये 3 बाद 86 धावा (लिन नाबाद 44, कार्तिक नाबाद 1)
>> लिनने 30 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.
>> स्कोअर - कोलकाता 15 ओव्हर्समध्ये 3 बाद 146
>> कार्तिकबरोबर चांगली जोडी जमली असतानाच लिन 74 धावांवर बाद झाला.
>> टायेच्या गोलंदाजीवर राहुलने लिनचा झेल घेतला.
>> लिननंतर फलंदाजीला आलेला रसेलही अवघ्या 10 धावा काढून परतला. सरनने त्याला बाद केले.
>> त्यानंतर कार्तिकने फटकेबाजीचा प्रयत्न केला पण तो 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुरेलही लवकर तंबूत परतला
>> पंजाबच्या सरन आणि टायेने प्रत्येकी दोन तर अश्विन आणि मुजीब उर रेहमानने प्रत्येकी एक विकेट घेतली.
>> कोलकात्याने 20 ओव्हर्समध्ये 191 धावा करत विजयासाठी पंजाबसमोर 192 धावांचे आ्हान ठेवले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅचचे PHOTOS
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.