Home | Sports | From The Field | Ipl 2018 Live And Update Chennai Superkings Vs Kings Xi Punjab In Mohali

पंजाब चार धावांनी विजयी; चेन्नई टीमची हॅट्ट्रिक हुकली, धोनीची 79 रनांची खेळी व्‍यर्थ

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2018, 08:19 AM IST

अार. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या किंग्जने रविवारी अायपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा विजयी रथ राेखला. पंजाबने तिसऱ्य

  • Ipl 2018 Live And Update Chennai Superkings Vs Kings Xi Punjab In Mohali

    चंदिगड- अार. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या किंग्जने रविवारी अायपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा विजयी रथ राेखला. पंजाबने तिसऱ्या सामन्यात चेन्नईवर ४ धावांनी मात केली. पंजाबचा हा दुसरा विजय अाहे.


    प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ७ बाद १९७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्जने ५ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. यासह चेन्नईचा तिसऱ्या विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला.


    गेलचे तुफानी अर्धशतक

    स्फाेटक फलंदाज ख्रिस गेलने पंजाबकडून तुफानी खेळी करताना शानदार अर्धशतक साजरे केले. त्याने ३३ चेंडूंत ७ चाैकार अाणि ४ षटकारांसह ६४ धावा काढल्या. यासह त्याने दमदार पुनरागमन केले.

Trending