आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL MI vs DD :जेसनची तिघांसाेबत अर्धशतकी भागीदारी; दिल्लीची मुंबईवर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सलगच्या दाेन पराभवातून सावरलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने शनिवारी यंदाच्या ११ व्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. सामनावीर जेसन राॅयच्या (९१) झंझावाती नाबाद अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने लीगमधील अापल्या तिसऱ्या सामन्यात यजमान अाणि गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर मात केली. दिल्लीने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह दिल्लीच्या टीमने लीगमध्ये पहिला विजय नाेंदवला. दुसरीकडे सुमार कामगिरीमुळे यजमान मुंबई इंडियन्सचा अापल्या घरच्या मैदानावरील  सलगच्या पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही. त्यामुळे टीमला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. अाता मुंबईचा सामना मंगळवारी विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमशी हाेईल. 


सूर्यकुमार यादवच्या (५६) अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमाेर विजयासाठी १९५ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात जेसन राॅयने तुफानी खेळीच्या बळावर दिल्लीला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. विजयामध्ये युवा फलंदाज ऋषभ पंतने ४७, मॅक्सवेलने १३, कर्णधार गाैतम गंभीरने १५ अाणि श्रेयस अय्यरने नाबाद २७ धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. 


दाेन पराभवानंतर विजयी

दाेन पराभवानंतर गाैतम गंभीरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघाला विजय मिळाला. अाता ही लय कायम ठेवण्याचे दिल्ली संघासमाेर माेठे अाव्हान असेल. 

 

सामनावीर जेसनने भागीदारीतून खेचली विजयश्री
दिल्ली टीमला पहिला विजय मिळवून देणारा जेसन राॅय सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने तुफानी फटकेबाजी करताना ५३ चेंडूंमध्ये नाबाद ९१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने प्रत्येकी ६ चाैकार अाणि उत्तुंग षटकार ठाेकले. त्याने सामन्यात तिघांसाेबत अर्धशतकी भागीदारी रचली. त्याने श्रेयससाेबत अभेद्य ६० धावांची भागीदारी केली. त्याने कर्णधार गंभीर अाणि ऋषभसाेबत अनुक्रमे ५० व ६९ धावांची भागीदारी रचून दिल्लीचा विजय निश्चित केला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि धावफलक...

बातम्या आणखी आहेत...