Home | Sports | From The Field | IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals

आयपीएल 11- विलियम्सनचे चाैथे अर्धशतक; हैदराबाद विजयाने अव्वलस्थानी

वृत्तसंस्था | Update - Apr 30, 2018, 02:58 AM IST

कर्णधार विलियम्सन (६३) अाणि युवा गाेलंदाज सिद्धार्थ काैल (२/२३) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद स

 • IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals

  जयपूर - कर्णधार विलियम्सन (६३) अाणि युवा गाेलंदाज सिद्धार्थ काैल (२/२३) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहाव्या विजयाची नाेंद केली. हैदराबाद सनरायझर्स संघाने लीगमधील अाठव्या सामन्यात यजमान राजस्थान राॅयल्सवर मात केली.


  सामनावीर विलियम्सनच्या नेतृत्वात हैदराबादने ११ धावांनी सामना जिंकला. या शानदार विजयासह हैदराबाद संघाने गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे कर्णधार अजिंक्य रहाणेच्या राजस्थान राॅयल्स संघाचा लीगमधील हा चाैथा पराभव ठरला.
  प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने ७ बाद १५१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात सिद्धार्थ काैलने धारदार गाेलंदाजी करताना राजस्थान संघाला ६ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १४० धावांवर राेखले.राजस्थानच्या विजयासाठी अजिंक्य रहाणेने (नाबाद ६५) दिलेली एकाकी झंुज अपयशी ठरली. त्याला संघाचा पराभव टाळता अाला नाही. इतर फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.


  सिद्धार्थने दाेन, संदीप शर्मा, बासिल, रशीद खान व युुसूफ पठाणने प्रत्येकी एक विकेट घेऊन हैदराबादचा विजय निश्चित केला.


  अजिंक्य खेळी व्यर्थ

  कर्णधार रहाणेने राजस्थान राॅयल्सच्या अजिंक्यसाठी केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. त्याने ५३ चेंडूंत नाबाद ६५ धावा काढल्या. यात ५ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. याशिवाय त्याने संजू सॅमसनसाेबत (४०) दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

  सामनावीर विलियम्सनच्या झंझावाती ६३ धावा
  तुफानी फटकेबाजीने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार विलियम्सनने हैदराबादच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने राजस्थानविरुद्ध अर्धशतक ठाेकले. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि २ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. त्याचे यंदाच्या लीगमधील हे चाैथे अर्धशतक ठाेकले. त्याने यापूर्वी, चेन्नई, पंजाब अाणि काेलकात्याविरुद्ध सामन्यात सलग अर्धशतक झळकावले.

  पुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक.....

 • IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals
 • IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals
 • IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals
 • IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals
 • IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals
 • IPL 28th match between Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals

Trending