आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL: दाेन पराभवांनंतर हैदराबादची मुंबई इंडियन्सवर मात, 31 धावांनी विजयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलगच्या पराभवाची मालिका खंडित करताना सनरायझर्स हैदराबाद संघ मंगळवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२०  क्रिकेट स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतला. युवा गाेलंदाज सिद्धार्थ काैलच्या (३/२३) धारदार गाेलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने वानखेडे मैदानावर गत चॅम्पियन मुंबई इंंडियन्सचा पराभव केला. हैदराबादच्या संघाने ३१ धावांनी शानदार विजय संपादन केला. हैदराबादचा लीगमधील हा चाैथा विजय ठरला. दुसरीकडे सातत्याने अपयशी ठरत असलेल्या मुंबई संघाला लीगमध्ये पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. 


कर्णधार विलियम्सन (२९) अाणि युसूफ पठाणच्या (२९) एकाकी झंुजीमुळे प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला ११८ धावा काढता अाल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाचा १८.५ षटकांत अवघ्या ८७ धावांवर खुर्दा उडाला. मुंबईच्या विजयासाठी सलामीवीर युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने दिलेली झंुज अपयशी ठरली. त्यामुळे टीमला अापल्या पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही. राेहितने २ धावांची खेळी केली. 

 

सनरायझर्स हैदराबाद संघाच्या विजयात युवा गाेलंदाज सिद्धार्थ काैलचे माेलाचे याेगदान राहिले. त्याने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मंगळवारी यजमान मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात धारदार गाेलंदाजी करताना तीन बळी घेतले. त्याने ४ षटकांमध्ये २३ धावा देताना हे यश संपादन केले. तसेच सामनावीर रशीद खान अाणि बासील थम्पीही चमकले. त्यांनी अव्वल गाेलंदाजी करताना प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यामुळे मुंबई संघाचा घरच्या मैदानावर विजयाचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. तसेच संदीप, नबी अाणि शाकीबने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

 

मुंबई ८७ धावांत गारद
धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या टीमला अवघ्या ८७ धावांवर अापला गाशा गुंडाळावा लागला. टीमच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. 

 

 

पुढील स्लाईडवर पहा धावफलक......

बातम्या आणखी आहेत...