Home | Sports | From The Field | IPL: Chennai Super Kings Vs Delhi Daredevils Lives And Updates

IPL: धाेनीचे नाबाद तिसरे अर्धशतक, चेन्नई किंग्जचा सहावा सुपर विजय; दिल्लीवर 13 धावांनी मात

वृत्तसंस्था | Update - May 01, 2018, 06:52 AM IST

कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने साेमवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्य

 • IPL: Chennai Super Kings Vs Delhi Daredevils Lives And Updates

  पुणे - कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने साेमवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयी षटकार मारला. यजमान चेन्नई संघाने घरच्या मैदानावर श्रेयस अय्यरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर शानदार विजयाची नाेंद केली. चेन्नईने १३ धावांनी सामना जिंकला. या विजयासह चेन्नई संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. दुसरीकडे ऋषभ पंतच्या अर्धशतकानंतरही दिल्लीचा तिसऱ्या विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे दिल्लीच्या टीमला सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला.


  कर्णधार धाेनी (नाबाद ५१) अाणि शेन वाॅटसनच्या (७८) झंझावाती खेळीच्या अाधारे चेन्नईने घरच्या मैदानावर दिल्लीसमाेर विजयासाठी २१२ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात दिल्ली संघाला ५ गड्यांच्या माेबदल्यात १९८ धावांपर्यंत मजल मारता अाली. संघाच्या विजयासाठी ऋषभ पंतने एकाकी झंुज देताना तुफानी अर्धशतक ठाेकले. मात्र, इतर फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे दिल्लीचा पराभव झाला.


  अासिफ चमकला

  चेन्नईच्या विजयात युवा गाेलंदाज अासिफने चमकला. त्याने दाेन गडी बाद केले. एनगिडी व जडेजाने एक बळी घेतला.

  विजय, ऋषभची निराशा
  दिल्ली संघाची विजयी लय कायम ठेवण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरचे प्रयत्न अपुरे ठरले. त्याने १३ धावांचे याेगदान दिले. मात्र, त्यानंतर संघाच्या विजयासाठी युवा फलंदाज ऋषभ पंत अाणि विजय शंकरने एकाकी झुंज दिली. त्यांनी चेन्नईची गाेलंदाजी फाेडून काढताना वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. ऋषभने ४५ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि ४ षटकारांच्या अाधारे ७९ धावा काढल्या. तसेच विजय शंकरने ३१ चेंडूंत एक चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे नाबाद ५४ धावांची खेळी केली.

  धाेनीचा झंझावात
  गत सामन्यातील पराभवातून सावरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला विजयी ट्रॅकवर अाणण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने साेमवारी कंबर कसली. यासाठी त्याने घरच्या मैदानावर तुफानी फटेकबाजी करत नाबाद अर्धशतक ठाेकले. त्याचे यंदाच्या सत्रातील हे नाबाद तिसरे अर्धशतक ठरले. त्याने यापूर्वी, विराट काेहलीच्या बंगळुरूविरुद्ध नाबाद ७० अाणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद ७० धावा काढल्या हाेत्या. यासह त्याने टीमच्या विजयात माेलाचे याेगदान देण्याची अापली लय कायम ठेवली.

  पुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक....

 • IPL: Chennai Super Kings Vs Delhi Daredevils Lives And Updates
 • IPL: Chennai Super Kings Vs Delhi Daredevils Lives And Updates
  चेन्‍नईतर्फे कर्णधार धोनीने 51 धावांची खेळी केली. यादरम्‍यान धोनीने 5 षटकार लगावले.
 • IPL: Chennai Super Kings Vs Delhi Daredevils Lives And Updates

  शेन वॉटसनने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

Trending