आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2011: प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित करु शकली नाही मुंबई इंडियन्स, दिल्लीने 11 धावांनी केला पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फिरोशजशाह कोटला स्टेडिअम मध्ये आयपीएल-11 च्या 55 व्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबईचा 11 धावांनी पराभव करत आयपीएलमधील आपले स्थान निश्चित केले आहे त्यामुळे मुंबईचा इंडियन्सचा आयपीएलमधील पुढील प्रवास थांबला आहे. 

 

दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलदांजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 अोव्हरमध्ये 4 बाद 174 धावा करत मुंबई इंडियन्सपुढे 175 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा सामना करत 19.3 ओव्हर मध्ये 163 धावा केल्या आणि 11 धावांनी पराभव झाला. यामुळे मुंबईची आयपीएलमधील स्थाननिश्चितीची आशा मावळली. दिल्लीच्या रिषभ पंतने सगळयात जास्त धावा केल्या.त्याने आठवी हाफ सेंच्युरी पूर्ण केली.  

 

फर्स्ट इनिंग - दिल्ली डेअरडेव्हील्स 
>> दिल्लीने टॉस जिंक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 
>> दिल्लीसाठी पृथ्वी शॉ आणि ग्लेन मॅक्सवेल जोडीने डावाची सुरुवात केली. 
>> पहिल्या तीन ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करत दिल्लीने 30 धावा केल्या. 
>> पण चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ धावबाद झाला. हार्दिक पांड्याने डायरेक्ट हिट करत त्याला बाद केले. 
>> त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये बुमराहने मॅक्सवेलला बोल्ड करत मुंबईला दुसरी विकेट मिळवून दिली. 
>> स्कोअर कार्ड - 5 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 2 बाद 39 (अय्यर नाबाद 1, पंत नाबाद 1)

>> सुरुवातीला दोन विकेट पडल्या तरी दिल्लीच्या रिषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. 

>> दिल्लीला नवव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर तिसरा धक्का बसला. 

>> मार्कंडेयच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरचा झेल क्रुणालने घेतला. 

>> अय्यर 6 धावा काढून बाद झाला.

>> स्कोअर कार्ड - 10 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 3 बाद 84 (पंत नाबाद 34, शंकर नाबाद 6 )

>> रिषभ पंत आणि व्ही शंकर यांनी चांगली फलंदाजी करत धावांचा ओघ सुरू ठेवला. 
>> मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दोघांनीही यश मिळू दिले नाही. 
>> स्कोअर कार्ड - 15 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 3 बाद 120 (पंत नाबाद 50, शंकर नाबाद 26 )
>> रिषभ पंत चांगली फलंदाजी करत असतानाच क्रुणालच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. 
>> स्कोअर कार्ड - 20 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 4 बाद 174 (शंकर नाबाद 43, अभिषेक नाबाद15 )

 

पुढे पाहा संबंधित PHOTOS..

 

बातम्या आणखी आहेत...