आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- सलगच्या लाजिरवाण्या पराभवाची मालिका खंडित करत गतचॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने मंगळवारी ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (अायपीएल) शानदार पुनरागमन केले. तीन पराभवांतून सावरलेल्या मुंबईने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ४६ धावांनी मात केली. काेहलीच्या बंगळुरू संघाला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी राजस्थान अाणि काेलकाता सामना रंगणार अाहे.
राेहित शर्मा (९४)अाणि लेव्हिसच्या (६५) बळावर मुंबई इंडियन्सने बंगळुरूसमाेर विजयासाठी खडतर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात बंगळुरू टीमला ८ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारता अाली. दरम्यान, टीमच्या विजयासाठी कर्णधार विराट काेहलीने (नाबाद ९२) दिलेली एकाकी झंुज अपयशी ठरली.
कृणालची धारदार गाेलंदाजी
मुंबईच्या विजयात कृणालचेही माेलाचे याेगदान ठरले. त्याने धारदार गाेलंदाजी करताना ३ विकेट घेतल्या. मॅक्लीनघन अाणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
सामनावीर राेहित
सामनावीर राेहितने ५२ चेंडूंत १० चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे ९४ धावा काढल्या. त्याने सत्रात पहिले अर्धशतकही साजरे केले. लेव्हिसने अर्धशतक ठाेकले. त्याने ४२ चेंडूंमध्ये ६ चाैकार अाणि ५ षटकारांसह ६५ धावा काढल्या.
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.