आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक तिसऱ्यांदा चॅम्पियन, साैराष्ट्र फायनलमध्ये पराभूत; विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- त्रिशतकवीर करुण नायरच्या नेतृत्वाखाली कर्नाटक संघाने मंगळवारी विजय हजारे ट्राॅफी जिंकली.कर्नाटकने फायनलमध्ये चेतेश्वर पुजाराच्या साैराष्ट्राचा पराभव केला. कर्नाटकच्या संघाने ४६.३ षटकांत ४१ धावांनी अंतिम सामना जिंकला.  यासह कर्नाटकचा संघ या स्पर्धेत तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरला. यापूर्वी २०१३-१४ अाणि २०१४-१५ मध्ये कर्नाटकचा संघ सलग किताबाचा मानकरी ठरला हाेता.  


गाेवथाम (३/२७) अाणि प्रसिध कृष्णा (३/३७) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर कर्नाटकने फायनलमध्ये विजयाची नाेंद केली.   


सामनावीर मयंक अग्रवालच्या (९०) झंझावातामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटकला साैराष्ट्रासमाेर खडतर २५४ धावांचे ठेवता अाले. प्रत्युत्तरात युवांच्या धारदार गाेलंदाजीमुळे साैराष्ट्र संघाची अवघ्या २१२ धावांमध्ये दाणादाण उडाली. साैराष्ट्र टीमकडून चेतेश्वर पुजाराने (९४) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली. इतर फलंदाजांच्या अपयशामुळे  टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  

 

गाेवथाम, प्रसिधची धारदार गाेलंदाजी 
कर्नाटकच्या विजयामध्ये गाेवथाम अाणि प्रसिध कृष्णाचे माेलाचे याेगदान राहिले. त्यांनी धारदार गाेलंदाजी करताना प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. याशिवाय स्टुअर्ट बिन्नी अाणि पवन देशपांडेने प्रत्येकी एक बळी घेतला. 

 

३ वर्षांनंतर कर्नाटकला तिसऱ्यांदा ट्राॅफी
कर्नाटकच्या संघाने अाता तिसऱ्यांदा या स्पर्धेची ट्राॅफी पटकावली अाहे. यापूर्वी २०१३-१४ अाणि २०१४-१५ मध्ये सलग दाेन सत्रांमध्ये कर्नाटक  चॅम्पियन ठरला हाेता. अाता तीन वर्षांनंतर तिसऱ्यांदा ट्राॅफी टीमने जिंकली.

 

मयंकचा झंझावात; सचिनला टाकले मागे
युवा सलामीवीर मयंक अग्रवालने फायनलमध्ये झंझावाती अर्धशतक ठाेकले. त्याने ७९ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार अाणि ३ षटकारांच्या अाधारे ९० धावांची खेळी केली. यासह त्याने एका स्पर्धेत एकूण सर्वाधिक धावांमध्ये सचिनला मागे टाकले. त्याच्या ८ सामन्यांत ७२३ धावा झाल्या. सचिनने २००३ च्या विश्वचषकात ६७३ धावा काढल्या हाेत्या. अाता मयंकने विजय हजारे ट्राॅफीतील ८ सामन्यात ७२३ धावांची नाेंद केली.

 

स्पर्धेत मयंक अव्वल
कर्नाटकचा मयंक अव्वल फलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम नाेंदवला. त्याने  अाठ सामन्यांत ७२३ धावा काढल्या. त्याने १०९, ८४, २८, १०२, ८९, १४०, ८१, ९० अशी खेळी केली. यामध्ये ३ शतके व ४ अर्धशतकांचा समावेश अाहे.

बातम्या आणखी आहेत...