आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL: यजमान दिल्लीला राेखून किंग्ज पंजाबने मिळवला पाचवा विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - अार. अश्विनच्या नेतृत्वाखाली किंग्ज इलेव्हन पंजाबने साेमवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. पंजाबने अापल्या सहाव्या सामन्यामध्ये गाैतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला. पंजाब टीमने ४ धावांनी सामना जिंकला. यासह पंजाबने लीगमध्ये पाचवा विजय संपादन केला. दुसरीकडे सातत्याच्या सुमार कामगिरीमुळे दिल्लीच्या टीमला पाचव्या पराभवाला सामाेरे जावे लागले. 


प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने ८ बाद १४३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सला ८ गड्यांच्या माेबदल्यात १३९ धावांपर्यंत मजल मारता अाली. दिल्ली टीमच्या फलंदाजाचा  विजयासाठीचा प्रयत्न अपुरा ठरला. युवा फलंदाज श्रेयसने (५७) एकाकी झुंज देताना शानदार अर्धशतक ठाेकले. मात्र, त्याला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही.  पंजाबकडून अंकित राजपूत, मुजीब व टायेने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. तसेच सरनने एक गडी बाद केला. 


गाैतम पुन्हा अपयशी : पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दिल्लीने पाचवा सामनाही गमावला. टीमला विजय मिळवून देण्याचा कर्णधार  गाैतमचा प्रयत्न अपुरा ठरला.

 

पुढील स्लाईडवर पहा, धावफलक ....

बातम्या आणखी आहेत...