आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T20 मध्ये प्रथमच भारतीय खेळाडू झाला असा आऊट, विराटबरोबर 2 वेळा घडले आहे असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केएल राहुल 18 धावा काढून हिट विकेटवर बाद झाला. - Divya Marathi
केएल राहुल 18 धावा काढून हिट विकेटवर बाद झाला.

स्पोर्ट्स डेस्क - निदाहास ट्रॉफीमध्ये भारताने तिसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला. या इस टी20 तिरंगी मालिकेत पहिलाच सामना खेळणारा केएल राहुल कमनशिबी ठरला. त्याचे कारण म्हणजे तो हिट विकेटने आऊट झाला. अशा प्रकारे बाद होणारा टी ट्वेंटीतील तो पहिला खेळाडू ठरला आहे. विराटही यापूर्वी टेस्ट आणि वनडे मध्ये अशाप्रकारे आऊट झालेला आहे. 


विराटबरोबरही झाले आहे असे 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टेस्ट आणि वनडे दोन्ही फॉररमॅटमध्ये हिट विकेटमुळे आऊट झालेला आहे. टेस्टमध्ये तो नोव्हेंबर 2016 मध्ये इंग्लंडच्या विरोधात हिट विकेटमुळे आऊट झाला होता. राजकोटमध्ये झालेल्या या मॅचमध्ये त्याने 40 धावा केल्या होत्या. तर वनडेमध्येही इंग्लंडच्या विरोधात तो सप्टेंबर 2011 मध्ये अशाच प्रकारे आऊट झाला होता. 


पुढील स्लाइड्सवर वाचा आतापर्यंत कोणते दिग्गज खेळाडू हिट विकेटमुळे झाले आहेत बाद..  

 

बातम्या आणखी आहेत...