आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या संथ फलंदाजीचा कोहलीने केला बचाव, म्हणाला-प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- धोनीच्या 59 चेंडूत 37 धावांवर चाहत्यांची नाराजी 

- कोहली म्हणाला- धोनी अनुभवी आहे, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे 

 

लंडन - इंग्लंडविरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात संथ फलंदाजी केल्यामुळे सध्या धोनीवर टीकेची झोड उठत आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली धोनीच्या बचावासाठी पुढे आला आहे. कोहली म्हणाला की, लोकांनी लगेचच अशी प्रतिक्रिया देणे दुर्दैवी आहे. जेव्हा तो चांगला खेळतो तेव्हा महान फिनिशर असतो आणि जेव्हा थोडी गडबड होते तेव्हा लोक त्याच्यावर टीका करतात. 


शनिवारी दुसऱ्या वन डे मध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या विरोधात 323 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर उतरली. त्यावेळी धोनी 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही त्याने 59 चेंडूत 37 धावाच केला. भारताने हा सामना  86 धावांनी गमावला. त्यानंतर स्टेडियमधील फॅन्सने धोनीला चिडवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरही धोनीलाच पराभवासाठी कारणीभूत ठरवले. 


वारंवार प्रश्न उपस्थित करणे चूक 
मॅचनंतर पुरस्कार सोहळ्यादरम्यान जेव्हा इंग्लंडचा कॉमेंटेटर नासीर हुसैनने कोहलीली याबाबत विचारले तेव्हा कोहलीने लोकांच्या वर्तनावर नाराजी वर्तवली. धोनी जेव्हा त्याच्या स्टाइलने फलंदाजी करत नाही, तेव्हा लोक त्याच्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत असतात. धोनीने अनेकदा टीमसाठी फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. पण यावेळी त्याने जास्त वेळ मैदानावर टिकायचे ठरवले होते. त्याच्याकडे अनुभव आहे आणि आम्हा सर्वांना त्याच्यावर विश्वास आहे. 


वेगाने फलंदाजी करण्यात वारंवार अपयश 
ऑस्ट्रेलियाच्या विरोधात गेल्या सप्टेंबर महिन्यात खेळलेल्या वन डे सिरीजपासून आतापर्यंत धोनीने 13 वेळा फलंदाजी केली. त्यात त्याने 29.66 च्या सरासरीने 267 धावा केल्या. तो 4 वेळा नॉट आऊटही राहिला. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 78.07 चा राहिला. म्हणजे नेहमीप्रमाणे वेगाने फलंदाजी करण्यात त्याला यश आले नाही. 

बातम्या आणखी आहेत...